...म्हणून काेविड लसीकरणाच्या डोसमध्ये असते २८ दिवसांचे अंतर!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 05:54 AM2021-03-08T05:54:31+5:302021-03-08T05:54:54+5:30

लसीच्या डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर का हवे?

... so there is a gap of 28 days between the dose of cavid vaccination! | ...म्हणून काेविड लसीकरणाच्या डोसमध्ये असते २८ दिवसांचे अंतर!

...म्हणून काेविड लसीकरणाच्या डोसमध्ये असते २८ दिवसांचे अंतर!

googlenewsNext

देशाच्या लसीकरण कार्यक्रमानुसार कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर असावे असे सांगण्यात आले आहे. इंटरनेटवर तर कोविड लसीकरणाविषयीच्या माहितीचा अक्षरश: महापूर आला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता गोंधळून जाणे स्वाभाविक आहे. आतापर्यंत देशभरात ३.२१ दशलक्ष  लोकांना लस देण्यात आली असून अनेकांनी दुसऱ्या डोससाठी आपले नाव आधीच नोंदवले आहे. या महामारीच्या काळात आवश्यक असलेल्या लसीविषयी माहिती घेण्यासाठी इंटरर्नल मेडिसीन विभागाच्या संचालक डॉ. फरहान इंगळे यांच्याशी साधलेला संवाद... 

लसीच्या डोसमध्ये २८ दिवसांचे अंतर का हवे?
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या अभ्यासानुसार आणि अनेक वैज्ञानिकांच्या मते हा कालावधी आणखी लांबवून ८-१२ आठवडे लांबवायला हवा. नॅशनल टेक्निकल ॲडव्हायसरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन (NTAGI) ने भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोविड लसींच्या दोन डोसमधील कालावधीबद्दल चर्चा करण्यासाठी व आढावा घेण्यासाठी अलीकडेच एक बैठक बोलावली होती. सध्याच्या योजनेनुसार कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचा दुसरा डोस २८ दिवसांच्या अंतराने दिला जातो. असे असले तरीही या लसींच्या परिणामकारकतेबद्दल सुरू असलेल्या संशोधनातून हाती आलेल्या नव्या पुराव्यांनुसार दुसरा डोस ८-१२ आठवड्यांनंतर दिला तर या लसीची परिणामकारकता अनेक पटींनी वाढते.

लस घेणे किती गरजेचे आहे? 
कोविड - १९ ची लस घेणे हा या आजारापासून संरक्षण मिळविण्याचा अधिक सुरक्षित मार्ग आहे. तुम्ही आजारी पडलात तर, मित्रपरिवार, कुटुंबीय, सहकारी व तुमच्या अवतीभोवतीच्या इतरांमध्ये हा आजार पसरवू शकता. दुसऱ्या बाजूला लसीमुळे तुमच्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार व्हायला मदत होते आणि संसर्गाची साखळी तोडण्यामध्ये त्या महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात उपलब्ध असलेल्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लसी परिणामकारकता चाचण्यांच्या आणि चिकित्सेच्या अत्यंत खडतर प्रक्रियेमधून गेल्या आहेत व त्यांना सार्वजनिक स्तरावर वापरण्यासाठीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या सुरक्षित आहेत. आपल्या फिजिशियनचा सल्ला घेतल्यानंतरच त्या घ्यायला हव्यात. 
लसीकरणातील अंतराविषयी विविध देशांमध्ये मतमतांतरे असण्याचे कारण काय?
लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात अँटी बॉडीज तयार होण्यासाठी २-३ आठवड्यांचा कालावधी लागतो. पहिल्या डोसनंतर अँटी बॉडीज तयार होण्याचा वेग धीमा असतो, पण दुसरा डोस घेतल्यानंतर या प्रक्रियेला वेग येतो. म्हणूनच किमान २८ दिवसांचे अंतर योग्य आहे. अनेक देशांमध्ये ३ महिन्यांचे अंतर राखले जात आहे, जेणेकरून त्यांच्या देशातील अधिकाधिक व्यक्तींचे लसीकरण व्हावे. भारतात आपला दृष्टिकोन वेगळा आहे. आपल्या लोकसंख्येचा आकार लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने लसीकरण करण्याचा मार्ग निवडण्यात आला आहे आणि लोकांना सुनियोजित वेळेत लस मिळेल अशी आशा आपण बाळगून आहोत.
लसीकरणानंतर काेणती खबरदारी घ्यावी? 
लसीचा पहिला डोस घेतला याचा अर्थ तुम्हाला कोविड - १९ चा संसर्ग होणार नाही असा नाही. दुसरा डोस घेतल्यानंतरही तुम्हाला ताे होऊ शकताे, पण त्याची लक्षणे अत्यंत सौम्य असतील आणि तुम्हाला रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासणार नाही. असे असले तरी सर्वकाळ दक्षता बाळगावीच लागेल. बाहेर जाताना मास्क लावणे, गर्दीच्या, गजबजलेल्या ठिकाणी जाणे टाळणे आणि स्वच्छता व आरोग्य जपणे अतिशय महत्त्वाचे आहे. लस घेतल्यानंतर तुम्हाला वेदना, हलका ताप, थकवा, शरीर दुखणे इत्यादी सर्वसाधारण साइड-इफेक्ट्स जाणवू शकतील. तेव्हा भरपूर द्रवपदार्थ घ्या. लस घेतलेल्या ठिकाणी स्वच्छ, थंड आणि ओल्या कपड्याने पुसून घ्या. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकस आहार घ्या. चांगली झोप घ्या. मद्यमान, धूम्रपान करणे आवर्जून टाळा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण या भीतीदायक विषाणूपासून सुरक्षित आहोत असे समजू नका, काळजी घेतली नाही तर लसींचे दोन्ही डोस घेऊनही तुम्हाला काेविडचा संसर्ग होऊ शकतो.

(मुलाखत – स्नेहा मोरे)

 

Web Title: ... so there is a gap of 28 days between the dose of cavid vaccination!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.