Join us  

...म्हणून तिने सोडले तिस-यांदा घर, अभ्यासाचा कंटाळा आल्याने घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 3:22 AM

अभ्यास नको, म्हणून तिने शाळेत जाणे बंद केले. शाळेच्या नावाखाली ती मैत्रिणींसोबत खेळायला जात असे. अचानक घरी आलेल्या बार्इंकडून मुलगी महिनाभर शाळेतच आली नसल्याचे समजले आणि आई गोंधळली.

- मनीषा म्हात्रेमुंबई : अभ्यास नको, म्हणून तिने शाळेत जाणे बंद केले. शाळेच्या नावाखाली ती मैत्रिणींसोबत खेळायला जात असे. अचानक घरी आलेल्या बार्इंकडून मुलगी महिनाभर शाळेतच आली नसल्याचे समजले आणि आई गोंधळली. तिने मुलीकडे याबाबत जाब विचारताच, मला अभ्यास नको म्हणत, तिने तिसºयांदा घर सोडल्याचा प्रकार बोरीवलीत उघडकीस आला. अवघ्या १० वर्षीय चिमुरडीच्या या प्रतापामुळे कुटुंबीयांची मात्र झोपच उडाली आहे.बोरीवलीच्या चिकूवाडी परिसरात १० वर्षांची नेहा (नावात बदल) आईवडील आणि ४ वर्षांच्या भावासोबत राहते. जवळच्याच शाळेत ती चौथी इयत्तेत शिकते. नेहाला शाळेचा कंटाळा होता. घरातून शाळेला जाते, असे सांगून बाहेर ती मैत्रिणींसोबत खेळायला जात असे. अशा प्रकारे चक्क महिनाभर ती शाळेतच गेली नाही. शाळेच्या शिक्षिकेकडून सोमवारी ही बाब आईला समजली. आई अभ्यासावरून तिला ओरडली. ‘मी शाळेत जाणार नाही,’ यावर नेहा ठाम राहिली. त्यामुळे आईने तिला मारले. याच रागात दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नेहा घरातून निघून गेली.यापूर्वीही अभ्यास नको, म्हणून नेहाने २ वेळा घर सोडले होते. पहिल्या वेळी २ दिवसांनी ती बोरीवली स्टेशनच्या बाहेर फुले विकणाºया मुलांसोबत आढळली, तर दुसºयांदा ती पोईसर सब वे येथील झोपडपट्टीत मुलांसोबत खेळताना दिसली. या खेपेसही ती घरी परत येईल, म्हणून त्यांनी रात्रभर वाट पाहिली. तिचा सगळीकडे शोध घेतला. तिचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. अखेर रात्री उशिराने नेहाच्या वडिलांनी बोरीवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी नेहाचा शोध सुरू केला. शोध सुरू असताना, गुरुवारी तिचे काका तिला सोबत घेऊन आले. मुलगी सुखरूप घरी परतली, म्हणून कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वाससोडला. आईनेही तिची प्रेमाने समजूत काढली.मुलगी आईवडिलांच्या ताब्यात असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणाजी सावंत यांनी दिली.‘ते’ तिघे अद्याप बेपत्ताच!दहिसर पूर्वेच्या जनकल्याण इमारतीत गीता सोपान काळभोर (५८) यांच्या दोन अल्पवयीन नातवंडांनी, परीक्षेत कमी मार्क मिळाल्याची चिठ्ठी सोडून १० जानेवारी रोजी घर सोडले. त्यांच्यासोबत काळभोर यांचा १६ वर्षांचा नातेवाईक मुलगाही बेपत्ता असल्याचे तपासात समोर आले.आठवडा उलटत आला, तरी अद्याप त्यांच्याबाबत काहीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी दिली.

टॅग्स :मुंबई