Exclusive : ... म्हणून राज ठाकरे आघाडीत नाहीत, पवारांचं लोकमतला 'मनसे' उत्तर 

By राजा माने | Published: September 21, 2019 10:16 AM2019-09-21T10:16:03+5:302019-09-21T10:22:28+5:30

राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याबाबत ते म्हणाले, राज हे चांगले वक्ते आणि संघटक आहेत.

... So Raj Thackeray is not leading in aghadi, Sharad Pawar's answer to Lokmat about 'MNS' | Exclusive : ... म्हणून राज ठाकरे आघाडीत नाहीत, पवारांचं लोकमतला 'मनसे' उत्तर 

Exclusive : ... म्हणून राज ठाकरे आघाडीत नाहीत, पवारांचं लोकमतला 'मनसे' उत्तर 

Next

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी नाशिक येथे झाला. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तान संदर्भातील वक्तव्यावरून शरद पवारांवर तोफ डागली. पवार यांच्यासारखा अनुभवी नेत्याने जेव्हा काश्मीरच्या प्रश्नी शेजारच्या राष्ट्राच्या शासन व प्रशासनाची स्तुती केली त्याचे आपल्याला दु:ख वाटले, अशा शब्दांत मोदींनी टीका केली होती. त्यावर पवार यांनी प्रत्युत्तर दिले, मी पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनतेबद्दल नेमके काय बोललो, हेही त्यांना माहीत नाही. आमच्या राष्ट्रप्रेमाबद्दल त्यांनी बोलू नये. तमाम जनतेला ते माहीत आहे. केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि समाजात संभ्रम निर्माण करायचा, ही यांची नीती आहे, असे पवार म्हणाले. त्यासोबतच, मनसेला आघाडीत घेण्याबाबत पवार यांना विचारले असता, मला मनसे आघाडीत असणे गरजेचं वाटतं असही म्हटलंय. 

राज ठाकरे यांच्या मनसेला आघाडीत घेण्याबाबत ते म्हणाले, राज हे चांगले वक्ते आणि संघटक आहेत. तरुणांमध्ये त्यांच्याविषयी आकर्षण आहे. ते आघाडीसोबत हवेत अशी आमची भूमिका होती. पण आमचा मित्रपक्षांच्या धोरणात ते बसत नाहीत, असे स्पष्टीकरण पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिले. तसेच, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीसोबत यायला तयार नाहीत. नेमकं तुमच्यात नक्की काय बिनसलंय? असे विचारले असता यावर आपल्याला काही बोलायचे नाही, असे पवारांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जागा वाटप ठरले असून घटक पक्षांना किती जागा द्यायच्या हेही ठरले आहे. आमच्यात कसलेही मतभेद अथवा बिघाडी नाही. नाशिक दौऱ्यापासून मी पाहतोय, लोकांना परिवर्तन हवंय. त्यात तरुण आघाडीवर आहेत. तोच अनुभव मराठवाड्यात मला येतोय, असा दावाही पवारांनी केला.

Web Title: ... So Raj Thackeray is not leading in aghadi, Sharad Pawar's answer to Lokmat about 'MNS'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.