लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशभरात वस्तू सेवा कर (जीएसटी) प्रणालीचे जंगी स्वागत झाल्यानंतर शहरातील वाहतूक सेवांमध्ये त्याचे पडघम दिसून आले. लोकल प्रवाशांचा प्रथम श्रेणीचा पास महागला आहे. तर रस्ते मार्गावर एसटीच्या शिवनेरीचा प्रवास पाच ते सात रुपयांनी स्वस्त झाला आहे. एसटीच्या वातानुकूलित शिवनेरीच्या बसचे तिकीट पाच ते सात रुपयांनी स्वस्त होणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. शिवाय शिवशाहीच्या तिकिटांच्या किमतीमध्ये देखील बदल होण्याचे संकेत देण्यात आले आहेत. सामान्य एसटी प्रवाशांच्या तिकिटात कोणताही बदल झालेला नाही. रेल्वे प्रथम श्रेणीचा पासही महागल्याचे सूत्रांनी सांगितले. परिवहन विभागाने ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नाममात्र वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. शहरी पत्त्यावरील वाहन नोंदणीच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. एकूणच वाहतूक सेवांमध्ये ‘हसू आणि आसू’ अशी संमिश्र प्रतिक्रिया आहे.
‘हसू आणि आसू’
By admin | Updated: July 2, 2017 04:24 IST