मुंबई : पावसाने मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी यंदाच्या सरींनी मात्र काही स्कायवॉकला गळती लागली आहे.
आतार्पयत 1912 मिमी पाऊस मुंबईत पडला. याने मुंबईकर सुखावले व वर्षभरासाठी पाणीही मिळाले. मात्र यंदाच्या पावसाने स्कायवॉकला गळती लागलेली आहे. दररोज लाखो मुंबईकर स्कायवॉकचा वापर करतात. पाऊस सुरू झाल्यानंतर ही संख्या दुप्पट होते. पण येथेही गळती लागल्याने काही मुंबईकर स्कायवॉकवर छत्री उघडून चालताना दिसतात. स्कायवॉकपासून शाळा व कॉलेज जवळ असलेले विद्यार्थीही या गळतीने हैराण झाले आहेत. कारण त्यांना याचा त्रस होतो.
मी दररोज स्कायवॉकने ये-जा करतो. पण यंदाच्या पावसात मला स्कायवॉकवरही छत्री उघडून चालावे लागले. आणि या समस्येबाबत तक्रार तरी कोणाकडे करायची असा प्रश्न आहे. येथील सुरक्षारक्षकांकडे याची तक्रार केली तर ते आम्ही यात काही करू शकत नसल्याचे उत्तर देतात, असे समीर पवार सायन येथील प्रवाशाने ‘लोकमत’ला सांगितले. तसेच विलेपार्ले येथील तुषार गायकवाड या विद्याथ्र्यानेही गळतीमुळे त्रस होत असल्याचे सांगितले.
स्कायवॉकची संकल्पना 2क्क्8 मध्ये मुंबईत आली़ आजतागायत एमएमआरडीएने मुंबईत एकूण 22 स्कायवॉक बांधल़े याचा मुख्य हेतू हा मुंबईकरांचा रेल्वे स्थानकाजवळचा पादचारी मार्ग सुखकर करणो हा होता़ सुरुवातीच्या काळात फेरीवाल्यांनी व रेल्वे स्थानकाजवळच्या दुकानदारांनी याला विरोधही केला़ मात्र टप्प्या-टप्प्याने हे स्कायवॉक उभे राहिल़े
यातील सर्वात लांबीचा स्कायवॉक हा वांद्रे रेल्वे स्थानकाजवळून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणारा आह़े याची लांबी एक किलोमीटर आह़े त्यापाठोपाठ
सर्वात लांबीचा स्कायवॉक हा सांताक्रूझ स्थानकाजवळचा आह़े ज्याची लांबी साडेसहाशे मीटर आह़े स्कायवॉकमुळे पादचा:यांना अगदी सहजपणो व आपला वेग कमी न
करता रेल्वे स्थानक गाठणो शक्य झाल़े वांद्रे स्थानकातून वांद्रे-कुर्ला संकुलाकडे जाणा:या स्कायवॉकवर एक गृहस्थ दररोज संध्याकाळी जॉगिंग करतात़ (प्रतिनिधी)
आमच्याकडे अद्याप स्कायवॉक गळतीची तक्रार दाखल झालेली नाही. पण तक्रार आल्यास आम्ही याबाबतची तपासणी हाती घेऊ व त्यानंतर गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर कारवाई करू.
- दिलीप कवठकर, संचालक
एमएमआरडीए सहप्रकल्प