Join us

धारावीत सहाव्यांदा, माहीममध्ये दुसऱ्यांदा शून्य रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:32 IST

मुंबई : कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी ठरला आहे. आशियातील या सर्वांत मोठ्या झोपडपट्टी भागातून मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण ...

मुंबई : कोरोनामुक्तीचा धारावी पॅटर्न सहाव्यांदा यशस्वी ठरला आहे. आशियातील या सर्वांत मोठ्या झोपडपट्टी भागातून मंगळवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर माहीममध्ये दुसऱ्यांदा शून्य स्कोअर आहे. धारावीत सध्या १६ तर माहीममध्ये ११७ सक्रिय रुग्ण आहेत.

एप्रिल २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर दाटीवाटीने वसलेल्या धारावीमध्ये प्रसार वाढण्याचा धोका होता. मात्र हॉटस्पॉट ठरलेला हा विभाग कोरोनामुक्त करण्यासाठी पालिकेला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. परंतु, बाधित रुग्णांच्या नातेवाइकांचा शोध घेणे, त्वरित निदान, चांगले उपचार व लवकर डिस्चार्ज या चौसूत्रीचा अवलंब करण्यात आला.

या प्रयत्नांना यश येऊन २४ डिसेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा धारावीत एकही बाधित रुग्ण सापडला नाही. त्यानंतर २२, २६, २७ आणि ३१ जानेवारीला एकही बाधित रुग्ण सापडला नाही. तर मंगळवारी धारावीत सहाव्यांदा एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, माहीममध्ये दुसऱ्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर दादरमध्ये सात बाधित रुग्ण सापडले आहेत.

२ फेब्रुवारी रोजीची आकडेवारी

विभाग.... डिस्चार्ज.... सक्रिय

दादर... ४,६७२..... ८६

धारावी.... ३,६०२... १६

माहीम..... ४,५३०.... ११७