Join us  

संक्रमण शिबिरांची परिस्थिती दयनीयच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 1:35 AM

म्हाडा संक्रमण शिबिरांच्या समस्या गंभीर आहेत. यामुळे या संक्रमण शिबिरांमध्ये रहिवासी जाण्यास नकार देतात;

मुंबई : म्हाडा संक्रमण शिबिरांच्या समस्या गंभीर आहेत. यामुळे या संक्रमण शिबिरांमध्ये रहिवासी जाण्यास नकार देतात; परिणामी इमारत कोसळल्यास त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. डोंगरी येथे मंगळवारी झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर पुन्हा या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.म्हाडाच्या मुंबई मंडळांतर्गत मुंबई शहरामध्ये एकूण ५६ संक्रमण शिबिरे आहेत. यामध्ये २१ हजार १३५ गाळे आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेले मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ १९७७ मध्ये म्हाडामध्ये विलीन करण्यात आले. या मंडळाने केलेल्या तपासणीत जुलै २०१३ अखेरपर्यंत संक्रमण शिबिरातील ८ हजार ४४८ गाळ्यांमध्ये अपात्र अथवा अनधिकृत रहिवासी वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. यापैकी काही रहिवासी ४० वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी तेथे राहत आहेत. शिबिरातील अधिकृत, अपात्र आणि अनधिकृत रहिवाशांचे निवाऱ्यासंबंधीचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे अथवा सुरू होणार आहे अशाच ठिकाणी शक्यतो त्यांचे कायम पुनर्वसन केले जाणार आहे. त्यासाठी त्यांची तीन प्रकारांत वर्गवारी करून पुनर्विकसित होणाºया संक्रमण शिबिरांमध्ये पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वी घेतला आहे.म्हाडाच्या सोळा हजार उपकरप्राप्त इमारतींपैकी सद्य:स्थितीमध्ये काही इमारतींची पडझड झाली आहे, तर काही इमारती उपकरातून वगळण्यात आल्याने प्रत्यक्षात उपकर प्राप्त इमारतींची संख्या आता १४ हजार २८६ इतकी आहे.