Join us  

निलंबनानंतरही अहवालावर स्वाक्षऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 5:13 AM

मुंबईसह, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पन्नासहून अधिक वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये स्वाक्ष-या करणा-या डॉ. प्रवीण शिंदे यांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आॅगस्ट महिन्यात कारवाईचे आदेश दिले.

मुंबई : मुंबईसह, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात पन्नासहून अधिक वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये स्वाक्ष-या करणा-या डॉ. प्रवीण शिंदे यांच्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने आॅगस्ट महिन्यात कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर याविषयी १० आॅक्टोबर रोजी सर्व वृत्तपत्रांत नोटीसद्वारे काम बंद केल्याचे जाहीर केले. मात्र असे असूनही नुकतेच नालासोपारा येथील गणेश पॅथॉलॉजी लॅबमधील वैद्यकीय अहवालावर डॉ. शिंदे यांची स्वाक्षरी आढळून आली आहे. याविषयी रुग्णाने वसई-विरार महानगरपालिकेत तक्रार दाखल केली आहे.महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अ‍ॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्ट संघटनेने डॉ. शिंदेविषयी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानंतर पाठपुराव्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. यापूर्वीदेखील मार्च २०१६ मध्येही शिंदे यांच्यावर अशाच प्रकारे वैद्यकीय परिषदेने कारवाई केली होती. डॉ. शिंदे यांचे १० आॅक्टोबरपासून काम बंद असूनही नालासोपारा येथील गणेश पॅथॉलॉजीच्या १८ आॅक्टोबरच्या रक्त चाचणीच्या अहवालावर त्यांची डिजिटल स्वाक्षरी आढळून आली आहे. याविषयी रुग्ण राजेंद्र ढगे यांनी वसई-विरार महानगरपालिकेत लेखी तक्रार केली आहे.शिवाय, यात लॅबची तपासणी करण्याचेही आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे, ‘आमची वसई’ या रुग्णमित्र संघटनेनेही अवैधरीत्या पॅथॉलॉजी लॅब चालविणाºयांवर कारवाईची मागणी केलीआहे.>स्वाक्षरी तपासून पोलिसांत तक्रार करणारमहाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कारवाईनंतर काम थांबविले आहे. मात्र याविषयी न्याय मिळण्यासाठी पुन्हा वैद्यकीय परिषदेकडे आम्ही दाद मागितली आहे. मी वृत्तपत्रांत काम थांबविल्याविषयी नोटीस दिल्यानंतरही असे प्रकार घडणे चुकीचे आहे. नालासोपारा येथील लॅबमधील वैद्यकीय अहवालावरील स्वाक्षरी डिजिटल आहे. ही स्वाक्षरी तपासून याविषयी पोलिसात तक्रार करणार आहे. शिवाय, या लॅबलाही नोटीस पाठविण्यात येणार आहे. - डॉ. प्रवीण शिंदे>रुग्णांच्या जीवाशी खेळ होतोयपॅथॉलॉजिस्टवर वैद्यकीय परिषदेने कारवाई केल्यानंतरही अशा प्रकारे वैद्यकीय अहवालावर स्वाक्षरी येणे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. अशा प्रकारांमुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होतोय, शिवाय या प्रकारांमुळे अवैधरीत्या वैद्यकीय लॅबचा सुळसुळाटही होतो आहे. - राजेंद्र ढगे, रुग्ण