Join us  

सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या निधीचा गैरवापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 5:31 AM

मुंबईतील नामांकित देवस्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्वस्तांनी भक्तांकडून अर्पण होणाºया निधीचा गैरवापर केल्याचा धक्कादायक आरोप श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने केला आहे

मुंबई : मुंबईतील नामांकित देवस्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्वस्तांनी भक्तांकडून अर्पण होणाºया निधीचा गैरवापर केल्याचा धक्कादायक आरोप श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने केला आहे. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृती समितीचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित निधीची वसुली करण्याची मागणी केली आहे.इचलकरंजीकर म्हणाले की, २०१६ साली मंदिर न्यासाच्या केलेल्या तपासणीत निधीचा गैरवापर झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. १ जानेवारी २०१५ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत न्यासाच्या तत्कालीन विश्वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यासंदर्भात अभ्यास दौरा केला. या दौºयासाठी ८ लाख ११ हजार २५९ रुपये आणि वाहकाला अधिकचा भत्ता म्हणून ४ लाख ८० हजार ०४० रुपये असा एकूण १२ लाख ९१ हजार २९१ रुपये इतका खर्च झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर कायदा विश्वस्तांना अशा प्रवास खर्चाची अनुमतीच देत नाही. त्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते.मुळात हा दौरा नियमबाह्य ठरत असून जलयुक्त शिवाराचा पैसा शासनालाच द्यायचा असतानाही दौºयाची गरजच काय होती, असा सवालही उपस्थित होतो. परिणामी, अशा विविध दौºयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत कृती समितीने याआधीच्या सर्व अभ्यासदौºयांची चौकशी करण्याची मागणीकेली आहे. शासनाच्या विधि व न्याय विभागाकडे ही मागणी करण्यात आली आहे. याशिवाय या प्रकरणातील सर्व दोषींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित रक्कम त्या-त्या विश्वस्तांकडून वसूल करण्याचे आवाहन केले आहे.अभ्यासदौºयांची अशी ही बनवाबनवी!२०१५ साली न्यासाचे तत्कालीन विश्वस्त प्रवीण नाईक यांनी २७ ते २९ जानेवारी असे ३ दिवस सांगली येथील मिरजच्या सिद्धिविनायक कर्करोग रुग्णालयाला भेट देण्यासाठी दौरा केला.मात्र या दौºयातील एक देयक (बिल) हे गोवा राज्यातील एका हॉटेलचे आहे.त्यातही धक्कादायक बाब म्हणजे नाईक यांच्यासह तत्कालीन विश्वस्त हरिश सणस यांनीही याच कालावधीत एकाच मार्गाने मुंबई-मिरज-मुंबई दौरा केला.मात्र त्यांनी स्वतंत्र गाडीतून प्रवास केला.परिणामी, एकाच वेळी एकाच मार्गावर दोन विश्वस्त प्रवास करीत होते, तर त्यांनी एकत्रित प्रवास का केला नाही, असा सवाल कृती समितीने उपस्थित केला आहे.नव्या विश्वस्तांशी चर्चा करायला हवी होतीश्री सिद्धिविनायक मंदिर न्यास समिती ही शासन नियंत्रित आहे. भ्रष्टाचाराचा सदर विषय हा शासन दरबारी असून शासनाने त्याबाबत तपासणी करावी. न्यासातर्फे त्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल. तसेच भ्रष्टाचाराचे आरोप जुन्या विश्वस्तांवर झालेले असून जुने विश्वस्त न्यासाचा कारभार पाहत असताना हे प्रश्न का उपस्थित केले नाहीत? तेदेखील तपासावे. आरोप करणाºयांनी नव्या विश्वस्तांशी याबाबत चर्चा करायला हवी होती. नवे विश्वस्त मंडळ पूर्ण जोमाने काम करीत असून लोकोपयोगी कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे.- आदेश बांदेकर, अध्यक्ष,श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास