Join us  

वन रुपी क्लिनिकचे झाले ‘शटरडाउन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 5:23 AM

सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात वैद्यकीय सेवा देण्याचे व्रत स्वीकारणारे ‘वन रुपी क्लिनिक’ने शटरडाऊन करण्याचे ठरविले आहे. राजकारण्यांचा जाच आणि मध्य रेल्वेचा दबाव या कारणांनी सोमवारी वन रुपी क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक डॉ. राहुल घुले यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला ही सेवा बंद करण्याविषयीचा निर्णय कळविला आहे.

मुंबई - सर्वसामान्यांना केवळ एक रुपयात वैद्यकीय सेवा देण्याचे व्रत स्वीकारणारे ‘वन रुपी क्लिनिक’ने शटरडाऊन करण्याचे ठरविले आहे. राजकारण्यांचा जाच आणि मध्य रेल्वेचा दबाव या कारणांनी सोमवारी वन रुपी क्लिनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालक डॉ. राहुल घुले यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला ही सेवा बंद करण्याविषयीचा निर्णय कळविला आहे. मात्र असे असले तरीही नव्या स्वरूपात शहर-उपनगरांत ही सेवा काही काळाने सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येणार आहे.सर्वसामान्यांना अत्यल्प दरात आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी या उद्देशाने मे महिन्यात सेवेचा आरंभ करण्यात आला. डॉ. राहुल घुले आणि डॉ. अमोल घुले या बंधूंनी सेवेची धुरा सांभाळून मुंबईकरांसह अनेक बाहेरच्या भागांतील रुग्णांनाही सेवा दिल्या. मध्य रेल्वेच्या १७ स्थानकांत ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यात आणखी पाच स्थानकांतील वन रुपी क्लिनिकचे उद्घाटन ३० आणि ३१ मार्चला होणार होते, पण काही राजकीय पक्षांच्या दबावामुळे हे उद्घाटन होऊ शकलेले नाही.मध्य रेल्वे प्रशासनावरील हा आरोप तथ्यहीन आहे. या सेवा देण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करीत आहोत. या सेवा बंद करण्याविषयीचे कोणतेही पत्र आमच्यापर्यंत आलेले नाही.- सुनील उदासी,मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वेपश्चिम रेल्वेने ही सेवा सुरू करण्यासाठी दर महिना अडीच लाख रुपये देण्याचे ठरविले, तर मध्य रेल्वे प्रशासनाने कोणतीही मदत अजूनपर्यंत दिली नाही.शिवाय, काही राजकारण्यांच्या मदतीने ही सेवा बंद करण्यासाठी सातत्याने दबाव आणत आहेत. त्यामुळे अखेरीस आम्हीच सेवा बंद करण्याच्या निर्णयाचे पत्र प्रशासनाला पाठविले आहे.च्परिणामी, ही सेवात्वरित बंद करण्यातयेत आहे, अशी माहितीडॉ. राहुल घुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :मुंबईऔषधं