श्री सिद्धिविनायकाचे दर्शन ५ दिवस राहणार बंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 09:22 PM2020-01-09T21:22:22+5:302020-01-09T21:24:51+5:30

दिनांक 15 ते 19 जानेवारीपर्यंत गणेशभक्तांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही आहे. 

Shri Siddhivinayak's Darshan will remain closed for 5 days | श्री सिद्धिविनायकाचे दर्शन ५ दिवस राहणार बंद 

श्री सिद्धिविनायकाचे दर्शन ५ दिवस राहणार बंद 

Next
ठळक मुद्दे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धीविनायक मंदिरातील गणेश मूर्तीचं शेंदूर लेपण केलं जाणार आहे.दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सिद्धीविनायक मूर्तीची विधिवत पूजा झाल्यानंतर गणेशभक्तांना गाभाऱ्यातून दर्शन सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई - लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या प्रभादेवीतील सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दररोज असंख्य भाविक येतात. मात्र, येत्या 25 जानेवारी पासून माघी गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री सिद्धीविनायक मंदिरातील गणेश मूर्तीचं शेंदूर लेपण केलं जाणार आहे. त्यामुळे दिनांक 15 ते 19 जानेवारीपर्यंत गणेशभक्तांना गाभाऱ्यात प्रवेश करता येणार नाही आहे. 

दिनांक 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सिद्धीविनायक मूर्तीची विधिवत पूजा झाल्यानंतर गणेशभक्तांना गाभाऱ्यातून दर्शन सुरू करण्यात येणार आहे. या काळात सिद्धिविनायकाच्या प्रतिमूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दरवर्षी अशा प्रकारचं शेंदूर लेपण श्री सिद्धिविनायकाच्या मूर्तीला केलं जात असतं. त्यादरम्यान गाभाऱ्यात असलेल्या मुख्य मूर्तीचं दर्शन बंद ठेवण्यात येते.  याकाळात गणरायाची दुसरी मूर्ती भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात येते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विशेष पूजा केली जाते आणि त्यानंतर पुन्हा नेहमीप्रमाणे दर्शन भाविकांना खुले केले जाते. 

Web Title: Shri Siddhivinayak's Darshan will remain closed for 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.