पश्चिम रेल्वे मार्गावरील सहा एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:44 AM2019-08-12T06:44:40+5:302019-08-12T06:45:09+5:30

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी ‘शॉपिंग आॅन व्हील’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे.

'Shopping on wheels' in six expressways on Western Railway | पश्चिम रेल्वे मार्गावरील सहा एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’

पश्चिम रेल्वे मार्गावरील सहा एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’

googlenewsNext

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी होण्यासाठी ‘शॉपिंग आॅन व्हील’ ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सहा एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे. तसेच पुढील दिवसांत आणखी १२ एक्प्रेसमध्ये ही सुविधा लागू केली जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस-अमृतसर पश्चिम एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस ते गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस, अहमदाबाद-मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस आणि अहमदाबाद-मुंबई सेंट्रल डबल डेकर एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’ संकल्पनेची सुरुवात केली आहे. २ मार्च रोजी मुंबई सेंट्रल-अहमदाबाद शताब्दी एक्स्प्रेस, वांद्रे टर्मिनस-जम्मू विवेक एक्स्प्रेसमध्ये ही संकल्पना लागू केली होती. त्यामुळे एकूण सहा एक्स्प्रेसमध्ये ही संकल्पना सुरू झाली आहे.

विमानाप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासात प्रवाशांना अधिक सुविधा देण्याच्या उद्देशाने १८ एक्स्प्रेसमध्ये ‘शॉपिंग आॅन व्हील’ ही नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे सहा मेल, एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा सुरू करून महिलांची सौंदर्य प्रसाधने, लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य, स्टेशनरीच्या साहित्यासह गृहोपयोगी वस्तूंची विक्री केली जात आहे.

अशी केली जाते वस्तूंची विक्री
मेल, एक्स्प्रेस तीन बाय तीन फुटांपर्यंतच्या शॉपिंग ट्रॉलीसह दोन कर्मचाऱ्यांद्वारे विक्री केली जात आहे. त्यांच्याकडे डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाइप मशीनची व्यवस्था आहे. या कर्मचाऱ्यांना विशेष गणवेश दिला असून सकाळी ८ ते रात्री ९ या वेळेत या कर्मचाºयांमार्फत वस्तूची विक्री केली जाते. एका खासगी कंपनीला पाच वर्षांचे ३.६६ कोटी रुपयांचे कंत्राट देऊन ‘शॉपिंग आॅन बोर्ड’ संकल्पना सुरू करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.

Web Title: 'Shopping on wheels' in six expressways on Western Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.