Join us  

धक्कादायक ! उन्हाची काहिली, ट्रेनच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलेच्या जीवावर बेतली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:57 PM

महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 54758 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा 1792 वर पोहोचला आहे.

देशभरात ठिकठिकाणी अडकलेल्या प्रवासी मजुरांना होत असलेल्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त होत असताना एक हृदय पिळवटून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे. आधी कोरोना आणि आता उष्माघाताने अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत. आपल्या गावी जाण्यासाठी एक महिला उन्हात ट्रेनची वाट पाहात कित्येक तास उभी होती. मात्र, ट्रेन आलीच नाही. त्यामुळे रखरखत्या उन्हामुळे महिलेची तब्बेत अचानक बिघडली. त्यानंतर महिलेला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्या  महिलेचा मृत्यू झाला.

वसई (पश्चिम) मधील सनसिटी ग्राउंडवर ही घटना घडली. नालासोपारा येथील रहिवाशी विद्योत्तमा शुक्ला (वय-57) या आपल्या उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. यासाठी त्या सनसिटी ग्राउंडवर पोहोचल्या. तिथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी 2 वाजेच्या सुमारात विद्योत्तमा यांना अचानक भोवळ आली. त्या जमिनीवर पडल्या. पोलीस आणि काही लोकांनी त्यांना बेशुद्धअवस्थेत हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

मुंबईत कोरोनाने अक्षरक्षः थैमान घातले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरांवरून प्रयत्न केले जात आहेत. मात्र हवे तसे यश मिळत नाही.मुंबईत अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दोन वेळेच अन्न मिळत नसल्याने मजुरांनी आपापल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने मजूर आपापल्या गावी पोहोचले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत 54758 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा 1792 वर पोहोचला आहे.