Join us  

मुंबईकरांवर शिवजयंतीचा ‘फिव्हर’, सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 3:20 AM

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंतीची तयारी जोमाने सुरू असून, शिवप्रेमींनी सोमवार, १९ फेब्रुवारीला मुंबईत ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या शिवजयंतीची तयारी जोमाने सुरू असून, शिवप्रेमींनी सोमवार, १९ फेब्रुवारीला मुंबईत ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.मुंबई शहरात भायखळा पूर्वेकडील श्री कापरेश्वर कृृपा गृहनिर्माण सहकारी संस्थेनेही शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यात ‘शिवरायांची जीवनगाथा’ या शीर्षकावर संस्थेतील मुले व मुली नाट्यप्रयोग सादर करणार आहेत. तसेच आवडते व्यक्तिमत्त्व घेऊन त्यांचे चरित्र, जीवन प्रवास रंगमंचावर सादर करण्याची संधी देणाºया आगळ््यावेगळ््या कार्यक्रमाचे आयोजनही संस्थेने केले आहे. शिवकालीन गाण्यांवर नृत्य, गायन आणि एकांकिकेची मेजवानीही मुंबईकरांना या ठिकाणी चाखायला मिळणार आहे. शस्त्रप्रेमींसाठी संस्थेने सोमवारीच शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शनही भरवले आहे. त्यामुळे भरगच्च कार्यक्रमांचा आनंद या ठिकाणी लुटता येणार आहे.मुंबई उपनगरातील शिवस्वराज्य प्रतिष्ठानने गोरेगाव पूर्वेकडे रथ शोभायात्रेचे आयोजन केले आहे. येथील संतोषनगर मार्केटमधून छत्रपती शिवाजी महाराजांची रथ शोभायात्रा सोहळ््याला सुरुवात होईल. या वेळी पारंपरिक पोषाखामध्ये सर्वांनी सामील होण्याचे आवाहन प्रतिष्ठानने केले आहे. त्यात पुरुषांनी पांढरा सदरा-लेंगा, भगवा फेटा आणि महिलांनी साडी नेसण्याचे नियोजित आहे. या सोहळ््याची सुरुवात रविवारी, १८ फेब्रुवारीलाच होणार आहे. सायंकाळी ५.३० ते १० वाजेदरम्यान कोल्हापूरचे शाहीर राजू राऊत यांच्या पोवाड्याचे आयोजन असेल, तर १९ फेब्रुवारीला दुपारी ३ ते रात्री १० वाजेदरम्यान महाराजांची आरती, बाइक रॅली आणि नंतर मिरवणूक पार पडेल.संतोषनगर मार्केटपासून सुरुवात होणारी बाइक रॅली नागरी निवारा, म्हाडा-संकल्प, आय.टी. पार्क , गोकुळधाम पोलीसठाणे, गोकुळधाम कॉलनी, ओबेरॉय, विक्रम गोखले मार्ग, लक्षधाम हायस्कूल, आरे भास्कर, हनुमाननगर, गणेश मंदिर ते संतोषनगर मार्केटपर्यंत मार्गक्रमण करेल. त्यानंतर असलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशा पथक, रथयात्रा हे विशेष आकर्षण असेल.घोडपदेवमध्ये रक्तदान शिबिरभायखळ्यातील घोडपदेव येथील धाकू प्रभुजी वाडी येथे श्री कृष्ण सेवा मंडळाने शिवजयंतीचे निमित्त साधत रविवार, १८ फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वाडिया रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने सकाळी ९ ते दुपारी २.३० वाजेदरम्यान हे शिबिर पार पडेल, तरी अधिकाधिक रक्तदात्यांनी या वेळी सामील होण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. रक्तदान करणाºया दात्यास आकर्षक भेटवस्तू देणार असल्याचेही मंडळाने स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई