मुंबई : गारगाई जलप्रकल्पाच्या जिओ टेक्निकल सव्र्हेला केंद्राची मंजुरी मिळाल्यामुळे शिवसेना-भाजपा युतीने आपली पाठ थोपटून घेण्यास सुरुवात केली आह़े याबाबत अभिनंदनाचा प्रस्तावही पालिकेच्या महासभेत आज सत्ताधा:यांनी आणला़ मात्र विधानसभा निवडणुकीच्या मुहूर्तावर श्रेय लाटण्याच्या युतीच्या या केविलवाण्या प्रकाराची विरोधी पक्षांनी चांगलीच खिल्ली उडवली़
सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी याबाबत पालिकेच्या महासभेत आज निवेदन केल़े शिवसेना पक्षप्रमुखांनी महापौर बंगल्यावरील बैठकीतून सर्व खासदारांना दिलेल्या आदेशानंतर पाठपुरावा करून ही मंजुरी मिळवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला़ मात्र ही मंजुरी गेल्याच वर्षी मिळाल्याचे निदर्शनास आणून विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी या अभिनंदनाची हवाच काढून घेतली़
हा प्रकल्प पूर्ण होण्यास पाच वर्षे आहेत़ त्यानंतर अभिनंदन ठराव आणणो योग्य ठरले असते, असा टोला राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ यांनी लगावला़ तर पाणी गळती सुरू असून अन्य जलप्रकल्पही रखडले आहेत, याकडे समाजवादीचे अशरफ आझमी यांनी सत्ताधा:यांचे लक्ष वेधल़े विरोधकांनी अशी बोलती बंद केल्यामुळे सत्ताधा:यांनी हा अभिनंदनाचा विषय थोडक्यात आटोपला़
गारगाई धरण प्रकल्पामुळे मुंबईकरांच्या घागरीत दररोज 44क् दशलक्ष लीटर पाण्याची वाढ होणार आह़े मात्र हा प्रकल्प सरकारी लाल फितीत अडकला होता़ अखेर दीड वर्षानंतर जिओ टेक्निकल सव्रेक्षणाला केंद्रातून हिरवा कंदील मिळाला आह़े (प्रतिनिधी)
मित्रपक्षांमध्येच
श्रेयासाठी शीतयुद्ध
1गारगाई प्रकल्प मार्गी लावण्यात भाजपाचे योगदान मोठे असल्याचे स्वतंत्र पत्रकार परिषदेतून भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी मंगळवारी जाहीर केले होत़े यामुळे तिळपापड झालेल्या शिवसेनेने आज सभागृहात अभिनंदनाचे निवेदन आणून समाधान करून घेतल़े
2परंतु मित्रपक्षाला हे रुचले नसल्याने भाजपा सदस्यांनी शिवसेना सदस्यांना भर सभागृहात चांगलेच सुनावल़े पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यार्पयत पालिकेचे महत्त्वाचे प्रकल्प उदा़
3गारगाई प्रकल्प पोहोचवून मंजूर करून घेण्यात मुंबई भाजपाचे योगदान आह़े त्यामुळे आमचीही नावे टाकली असती तर या अभिनंदनाचा आणखी आनंद झाला असता, असे भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक दिलीप पटेल यांनी शालजोडीतून मारल़े