Join us  

शिवाजी महाराज, सावरकरांची नीती अवलंबावी, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 2:06 AM

मुंबई : सागरी सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नीती अवलंबिणे, हेच देशाच्या हिताचे आहे. त्यांच्या नीतीप्रमाणेच कार्य करणे हीच खरी शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले.

मुंबई : सागरी सुरक्षेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नीती अवलंबिणे, हेच देशाच्या हिताचे आहे. त्यांच्या नीतीप्रमाणेच कार्य करणे हीच खरी शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातर्फे ‘सागरी सुरक्षा, समीक्षा आणि उपाययोजना’ या विषयावर दादर येथील शिवाजी पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे चर्चासत्राचे अयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात ते बोलत होते.दीपक केसरकर म्हणाले की, भारताला मोठा सागरी किनारा लाभलेला आहे. सागरी सीमांची सुरक्षा संवेदनशील बाब असून, सागरी सीमांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. दरम्यान, या चर्चासत्रात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी, माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे संरक्षक इंद्रेश कुमार, सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, निवृत्त एअर कमांडर राहुल मसलेकर, निवृत्त ब्रिगेडिअर हेमंत महाजन, राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे राष्ट्रीय कार्यवाह विनायक काळे आणि संजय पराशर तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.इंद्रेश कुमार यांनी देशात होणाºया घुसखोरीवर सखोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आतापर्यंत २३ देशांतील शरणार्थींनी भारतात घुसखोरी केली आहे. रोहिंगेदेखील आता देशात शिरकाव करत आहेत. अशा परिस्थितीत आजची सागरी सुरक्षेवरील चर्चा ही अशा घुसखोरीला रोखण्यासाठी तसेच देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरेल.रणजीत सावरकर म्हणाले की, विस्तीर्ण पसरलेल्या सागरी सुरक्षेची जबाबदारी केवळ नौदल अथवा तटरक्षक दल यांच्यावरच अवलंबून नाही, तर प्रत्येक नागरिकानेही दक्ष राहून सागरी सीमेचे आपापल्या परीने रक्षण केले पाहिजे. तरुणांचा यामध्ये सहभाग असायला हवा.

टॅग्स :दीपक केसरकर