Join us

स्वाभिमान असेल तर शिवसेना सत्ता सोडेल - अशोक चव्हाण

By admin | Updated: February 20, 2017 15:11 IST

शिवसेना-भाजप एकमेकांना पूरक असून दोघांमधील माहिती आपोआप बाहेर येते असा टोला अशोक चव्हाणांनी लगावला

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 -  'स्वाभिमान असेल तर शिवसेना सत्ता सोडेल', असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. तसंच शाईफेक प्रकरणावर बोलताना शाईफेकीमागे भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फूस असल्याचा आरोपही अशोक चव्हाण यांनी केला आहे. 'आरएसएसच्या मंडळीची फूस असल्याशिवाय कुणी शाईफेकीची हिंमत कसा करु शकतो?, असा सवाल यावेळी अशोक चव्हाणांनी विचारला. एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना अशोक चव्हाणांनी ही वक्तव्यं केली आहेत. 
 
''सेना-भाजपाचे एकमेकांवरील आरोप अत्यंत गंभीर स्वरुपाचे असून भाजपाने आमच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा शिवसेना त्यांच्याबद्दल काय बोलते याकडे लक्ष द्यावं असं'', अशोक चव्हाण बोलले आहेत.  ''शिवसेना-भाजप एकमेकांना पूरक असून दोघांमधील माहिती आपोआप बाहेर येते'', असा टोलाही अशोक चव्हाणांनी लगावला. 
 
''सरकारचा आपल्या लोकांना वाचवून, विरोधकांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. पारदर्शकतेच्या गोष्टी करतात, मग ती लॉजिकल एंडला गेली पाहिजे. आरोप असलेल्या मंत्र्यांची चौकशी होण्याआधीच मुख्यमंत्री क्लीन चिट देतात'', असा आरोप अशोक चव्हाणांनी केला. 
 
काँग्रेसमधील अंतर्गत वादावर बोलताना  ''गुरुदास कामत- संजय निरुपम यांच्यात वाद नाही, वैचारिक मतभेद आहेत'', असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.
 
 - मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017