Join us  

शिवसेना गप्प नाही, स्वबळाची तयारी सुरू! - उद्धव ठाकरेंचा इशारा

By admin | Published: July 26, 2016 8:53 AM

सत्तेचा वापर करुन शिवसेनेची कोंडी होणार असेल तर सरकारमधून सरळ बाहेर पडू असा स्पष्ट इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २६ - 'सामना' या मुखपत्रातील मुलाखतीतून गेले दोन दिवस सरकारवर तोफ डागत अन्य विषयांवरही स्पष्ट मत मांडणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तिस-या दिवशीही हा सिलसिला कायम ठेवला आहे. ' एका बाजूला भाजप स्वबळाचा नारा देत असताना शिवसेनासुद्धा काही गप्प नाही बसलेली नाही असे सांगत सत्तेचा वापर करुन शिवसेनेची कोंडी होणार असेल तर सरकारमधून सरळ बाहेर पडू' असा स्पष्ट इशारा त्यांनी मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत दिला आहे. सोमवारच्या मुलाखतीत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वारच प्रश्चचिन्ह उपस्थित केले होते. तर आजच्या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्वपूर्ण विषयांवर मतं मांडत महाराष्ट्राच्या राजकारणावर बेधडक भूमिका मांडली आहे. 
 
 आणखी वाचा : 
(फक्त जाहिरातबाजीवर देश चालणार नाही, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका)
(...तर शिवसेना वेगळा निर्णय घेईल ! - उद्धव)
  •  
'एका बाजूला भाजप स्वबळाचा नारा देताना शिवसेनासुद्धा काही गप्प नाही बसली. मीसुद्धा शिवसेनेचा मुख्यमंत्री आणणार म्हणजे आणणारच. ही तर माझी शपथच आहे. त्यामुळे त्याला प्राधान्य दिल्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी गौण आहेत माझ्यासाठी. ते जर का युतीत शक्य नसेल तर युती राहणार नाही'  असे उद्धव यांनी म्हटले आहे. तसेच ' ‘शिवसेनेची एकहाती सत्ता कधीच आली असती, पण ‘युती’त आमची पंचवीस वर्षे सडली. युती न करता शिवसेना लढत राहिली असती तर आजचं चित्र वेगळं असतं ,  असे सांगत राज्यात भाजपा नव्हे तर शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचे त्यांनी अप्रत्यक्षरित्या नमूद केले. मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकेल असा विश्वास व्यक्त करतानाच भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढण्याची तयारी करीत असेल तर शिवसेनाही गप्प बसलेली नाही, असा दणकाही उद्धव यांनी दिला. सरकारमुळे शिवसेनेची कोंडी होतेय असे वाटेल त्याक्षणी सत्तेतून बाहेर पडेन, असा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला.
 
दरम्यान या मुलाखतीत उद्धव यांनी एकनाथ खडसेंवरही टीकास्त्र सोडले. एकनाथ खडसेंचा युती तोडण्यात मोठा वाटा होता. प्रमोद महाजन युतीचे शिल्पकार तर हे महाशय (खडसे) युतीचा भंगकार अशी टीकाही उद्धव यांनी केली. 
वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर भाष्य करताना उद्धव यांनी विदर्भ महाराष्ट्रातच राहील असे निक्षून सांगितले. संपूर्ण मंत्रिमंडळात चांगली महत्त्वाची खाती असलेले मंत्री विदर्भाचेच आहेत. त्यामुळे विदर्भाचा विकास आता करा. पण त्याचबरोबरीने मराठवाड्याला विसरू नका. कोकण, खान्देश, पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय करू नका आणि मुंबईवर तर नाहीच नाही, असेही त्यांनी बजावले.