Deepak Kesarkar: फक्त शिवसेनेच्या नावावर आमदार निवडून येत असते, तर...; शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 05:48 PM2022-06-25T17:48:33+5:302022-06-25T18:10:32+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यानंतर, शिवसेना बाळासाहेब या नावारुन उद्धव ठाकरेंनी शिंदेगटाला चांगलंच सुनावलं.

Shiv sena: If MLAs are elected only in the name of Shiv Sena, then ...; A group of Shinde group spokespersons deepak kesarkar | Deepak Kesarkar: फक्त शिवसेनेच्या नावावर आमदार निवडून येत असते, तर...; शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा टोला

Deepak Kesarkar: फक्त शिवसेनेच्या नावावर आमदार निवडून येत असते, तर...; शिंदे गटाच्या प्रवक्त्यांचा टोला

googlenewsNext

मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या ५ दिवसांपासून मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात शिवसेना आमदारांचा मोठा गट फुटून वेगळा झाल्याने राजकीय उलथापालथ पाहायल मिळत आहे. शिंदे गटासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं असून आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यातच, शिंदेगटाने 'शिवसेना बाळासाहेब' असं नाव आपल्या गटाला दिल्याने वाद अधिकच तीव्र झाला. शिंदे गटाच्यावतीने मंत्री दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यानंतर, शिवसेना बाळासाहेब या नावारुन उद्धव ठाकरेंनी शिंदेगटाला चांगलंच सुनावलं. तुमच्या बापाचं नाव वापरुन मतं मागा, शिवसेनेच्या बापाचं नाव वापरुन मतं मागू नका, असेही ते म्हणाले. यावर, आता शिंदेंच्या मुख्य प्रवक्त्याने प्रत्युत्तर दिलं आहे.

आम्हाला उद्या जाऊन मतं मागायची नाहीत 2.5 वर्षानंतर मतं मागायची आहेत, आत्ताच मत मागायची नाहीत. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो आहे. त्यामुळे, मी अगोदर दुसऱ्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलो होतो. म्हणजे, केवळ पक्षाच्या तिकीटावरच नाही, तर स्वत:च्या कामावर, स्वत:च्या लोकप्रियतेवरही, स्वताच्य जनसंपर्कावर आमदार निवडून येत असतात, असे दिपक केसरकर यांनी म्हटलं. 

''आम्ही कोणाच्याच नावाने मतं मागितलेली नाही. आम्ही अन्य पक्षातूनही निवडून आलो आहोत. फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून येत असते तर सगळे निवडून आले असते. उमेदवाराचंही गुडविल असतं आणि पक्षाचंही ठरावीक मतदान असतं. आजच्या विधान सभेतील किमान ७० ते ८० किंवा १०० उमेदवार कुठल्याही चिन्हावर निवडून येऊ शकतात. आमदारांचं मतदारसंघात आणि जिल्ह्यात काम असतं,'' असे म्हणत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना उत्तर दिलं.

येण्यापूर्वीच पक्षप्रमुखांना भेटलो होतो

मी इकडे येण्यापूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटलो. मी आमची बाजू त्यांच्याजवळ मांडली. माझ्यासह पक्षातील वरिष्ठ मंत्र्यांनीही त्यांना येथील आमदारांचे म्हणणे सांगितले होते. आम्ही तिथूनच इकडे आलो आहोत. मग, आता तिकडे जाऊन वेगळं काय सांगणार, असे  दिपक केसरकर यांनी म्हटले. तसेच, कुणीही उद्धव ठाकरेंविरोधात नाही. आदित्य यांच्या गाडीत होतो. त्यांनाही सगळं समजावून सांगितलं. तुम्ही आणि भाजपा एकत्रच राहिलं पाहिजे हे मी पहिल्यापासून सांगतोय.

संजय राऊतांना दिलं उत्तर

आम्हाला उद्या जाऊन मतं मागायची नाहीत 2.5 वर्षानंतर मतं मागायची आहेत, आत्ताच मत मागायची नाहीत. मी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो आहे. त्यामुळे, मी अगोदर दुसऱ्या पक्षाच्या तिकीटावर निवडून आलो होतो. म्हणजे, केवळ पक्षाच्या तिकीटावरच नाही, तर स्वत:च्या कामावर, स्वत:च्या लोकप्रियतेवरही, स्वताच्य जनसंपर्कावर आमदार निवडून येत असतात. संजय राऊत यांना असं बोलायची सवय आहे, ते विधिमंडळाचे सदस्य नाहीत. त्यामुळे, त्यांना आम्ही गंभीर घेत नाही, असे केसरकर यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते संजय राऊत

शिवसेना कार्यकारिणीच्या बैठकीत झालेल्या 6 नंबरच्या ठरावात शिंदे गटाच्या शिवसेना बाळासाहेब या नावाला आक्षेप घेण्यात आला आहे. कार्यकारिणीच्या ठराव क्रमांक 6 मध्ये आम्ही स्पष्टपणे सांगितलं आहे की, इतर कोणत्याही संघटनेला शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. कोणताही बेईमान, कोणताही गद्दार हे नाव वापरुन आपलं राजकारण, आपला स्वार्थ साधू शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तसेच, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडला की, जर तुम्हाला मतं मांडायची आहेत, तर तुमच्या बापाच्या नावाने मांडा, शिवसेनेच्या बापाच्या नावाने नको, असेही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.  

Web Title: Shiv sena: If MLAs are elected only in the name of Shiv Sena, then ...; A group of Shinde group spokespersons deepak kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.