दहिसरमध्ये शिवसेनेकडून पेट्रोल, डिझेलचं मोफत वाटप; वाहन चालकांना सुखद धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 03:26 PM2021-06-13T15:26:18+5:302021-06-13T15:27:16+5:30

केंद्र सरकारवर शिवसेनेची उपहासात्मक टीका; पेट्रोल, डिझेल दरवाढीचा अनोखा निषेध

Shiv Sena distributes petrol diesel free in dahisar on Aditya Thackerays birthday | दहिसरमध्ये शिवसेनेकडून पेट्रोल, डिझेलचं मोफत वाटप; वाहन चालकांना सुखद धक्का

दहिसरमध्ये शिवसेनेकडून पेट्रोल, डिझेलचं मोफत वाटप; वाहन चालकांना सुखद धक्का

Next

- मनोहर कुंभेजकर

मुंबई-एकीकडे पेट्रोल- डिझेलचे भाव गगनाला भिडले असतांना दहिसर मध्ये शिवसेनेने चक्क 1 लिटर पेट्रोल- डिझेलचे मोफत वाटप करून वाहन चालकांना सुखद धक्का दिला. राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने या उपक्रमाचे आयोजन केले होते. दहिसर शिवसेना शाखा क्रमांक 1 च्या वतीने आज बोरिवली पश्चिमेकडील आयसी कॉलनी पेट्रोल पंपावर सकाळी वाहन चालकांना 1 लिटर पेट्रोल तसेच डिझेल मोफत देण्यात आले. 

केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या पेट्रोल- डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. यावर काँग्रेसने आंदोलन केल्यानंतर आता शिवसेनेने हा आगळावेगळा उपक्रम करून उपहासात्मक टीका केली आहे. शिवसेना उपनेते आणि म्हाडाचे सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या हस्ते 1 लिटर मोफत पेट्रोल- डिझेलचे वाटप यावेळी करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर , मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, उपविभागसंघटक शकुंतला शेलार, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा उपस्थित होते .

दरम्यान विभागातील 14 ते 44 वयोगटातील 30 दिव्यागांचे मोफत लसीकरण करण्यात आले. तर बोरीवली (प.) समाज कल्याण केंद्र, आय.सी. कॉलनी,  येथे आरोग्य सेविकांचा  विनोद घोसाळकर यांच्या हस्ते स्टीमर, मास्क, विटामीन सी औषध व छत्री देऊन सत्कार करण्यात आला. तर 500 गरजू नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले. तर 500  ज्येष्ठ नागरीकांना छत्री वाटप , तसेच 700 रिक्षाचालकांना सेफ्टी शिल्डचे वाटप बोरिवली (प.) गणपत पाटील नगर, गल्ली नं.१, न्यू लिंक रोड याठिकाणी करण्यात आले. विविध उपक्रम आयोजित करून मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस घोसाळकर कुटुंबाने साजरा केला.

Web Title: Shiv Sena distributes petrol diesel free in dahisar on Aditya Thackerays birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.