Join us  

शाहरूख बनला इंटरपोलचा जागतिक सदिच्छा दूत

By admin | Published: August 31, 2014 2:45 AM

बॉलीवूडचा किंग खान उर्फ शाहरूख खानच्या कीर्तीत मानाचा शिरपेच खोवला गेला आहे!

पूजा सामंत - मुंबई
बॉलीवूडचा किंग खान उर्फ शाहरूख खानच्या कीर्तीत मानाचा शिरपेच खोवला गेला आहे! इंटरपोलने संघटित गुन्हेगारीविरुद्ध उभारलेल्या  ‘टर्न बॅक क्राइम’  चळवळीचा जागतिक सदिच्छा दूत (ग्लोबल ब्रँड अम्बेसेडर) म्हणून शाहरूखची नुकतीच नियुक्ती केली आहे. बॉलीवूडच्या अभिनेत्याला  जागतिक पातळीवर  इंटरपोलच्या चळवळीचा  सदिच्छा दूत म्हणून मिळालेली ही पहिलीच संधी आहे.
भारतीय सिनेमातील योगदान, सामाजिक बांधिलकी आणि अभिनेता म्हणून असलेली वैश्विक प्रतिमा लक्षात घेऊन इंटरपोलने शाहरूख खानची निवड केली आहे. शाहरूखची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित नसून त्याच्या कीर्तीचे ङोंडे सातासमुद्रापार रोवले गेले आहेत. त्याचा चाहता वर्ग वैश्विक आहे. सदर जबाबदारी स्वीकारल्याबद्दल इंटरपोलचे सचिव रोनाल्डो के. नोबेल यांनी शाहरूखचे आभार मानले आहेत.
जागतिक स्तरावर संघटित गुन्हेगारीत वाढ होत आहे, ज्यात मादक-अमली पदार्थाची तस्करी, मानवी तस्करी, सायबर क्राइम, अपहरण, बालगुन्हेगारी, भ्रष्टाचार या अपराधांविषयी जनजागृती व्हावी आणि सर्वसामान्यांर्पयत त्याचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी इंटरपोलने ‘टर्न बॅक क्राइम’ यावर चळवळ उभी केली आहे. (प्रतिनिधी)