Sexual abuse of a minor girl | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

मुंबई : घाटकोपरमध्ये ६ वर्षीय मुलीवर ४९ वर्षांच्या विकृताने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी नामदेव श्रीधर मयेकरला गुरुवारी रात्री उशिराने अटक केली. घाटकोपर परिसरात ६ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. गुरुवारी ती घराबाहेर खेळत असताना नामदेवची नजर तिच्यावर पडली.

नामदेवने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून गावी गेलेल्या शेजारच्यांच्या घरी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. शेजारच्यांनी घरावर लक्ष ठेवण्यासाठी घराची चावी त्याच्याकडे दिली होती. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मुलीचा शोध सुरू केला. त्याच दरम्यान शेजारच्या घराचा दरवाजा अर्धवट उघडा दिसल्याने त्यांनी आतमध्ये पाहिले. तेव्हा नामदेवला त्यांनी रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. मुलगीही घाबरली आहे. या प्रकरणी घटनेची वर्दी मिळताच घाटकोपर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी पॉक्सो, लैंगिक अत्याचार, अपहरणाच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

घराबाहेर खेळत असताना नामदेवने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून गावी गेलेल्या शेजारच्यांच्या घरी नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sexual abuse of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.