Join us  

प्रवासी आसनासमोर पॅनिक बटण बसवा, खटुआ समितीची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 1:48 AM

मुंबई : शहरासह राज्यातदेखील प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिला प्रवाशांना दिवसा फिरणेदेखील सोईचे नसल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे.

मुंबई : शहरासह राज्यातदेखील प्रवासी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिला प्रवाशांना दिवसा फिरणेदेखील सोईचे नसल्याचे भयानक वास्तव समोर येत आहे. हाच मुद्दा लक्षात घेता आॅटोरिक्षांसह टॅक्सीमध्ये प्रवासी आसनासमोर पॅनिक बटण बसवण्याची शिफारस खटुआ समितीने केली आहे. याचबरोबर रिक्षा-टॅक्सी परमीटला आधार कार्डशी लिंक करण्याची शिफारसदेखील समितीने केली आहे.शासनाने आॅटोरिक्षांसह टॅक्सीचे भाडे दरसूत्र निश्चित करण्याबाबत बी. सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. यात विधिज्ञ, परिवहन आयुक्त आणि सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, खासगी वातानुकूलित अ‍ॅप बेस टॅक्सी, काळी-पिवळी टॅक्सी या विषयांबद्दल विविध शिफारशी या अहवालात मांडल्या आहेत. राज्याच्या मोटार वाहन विभागाच्या संकेतस्थळावर हा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.>अहवालातील शिफारशीअ‍ॅप बेस टॅक्सी पुरवणाºया कंपन्यांचा लोगो वाहनांवर दोन्ही बाजूला असणे आवश्यक आहे.परमिटसाठी १० वर्षांचा अधिवास आणि पीएसव्हीए बॅचसाठी ३ वर्षांचा अधिवास प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. त्याचबरोबर चालकाला मराठीची माहिती आणि भौगिलिक परिस्थितीची माहिती असणे आवश्यक आहे. संबंधित पोलीस स्थानकातदेखील चालकाची माहिती असणे आवश्यक आहे.प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मनुष्यबळ अत्यंत कमी आहे. हे जनहितार्थ नाही. यामुळे एका अधिकाºयावर अनेक जबाबदाºया आहेत. मनुष्यबळ वाढवून मीटरप्रमाणे दर आकारले जातात की नाही, यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर समिती नेमण्यात यावी.अ‍ॅप बेस टॅक्सी आणि काळी-पिवळी टॅक्सी असे वर्गीकरण न करता परमिटसाठी फी म्हणून सरसकट १० हजार रुपये करावे.काळी-पिवळी टॅक्सी आणि रिक्षांना दुपारी १२ ते ४ या वेळेत हॅप्पी अवर्स घोषित करून सवलतीच्या दरात भाडे आकारण्याची मुभा देण्यात यावी.निळ्या रंगाचा शर्ट आणि टाय, काळी पँट आणि काळे बूट असा गणवेश असावा.अ‍ॅप बेस टॅक्सींसाठी सिक्युरिटी डिपॉझिट १० लाख करण्यात यावे.शहरांमधील टॅक्सीत अग्निरोधक यंत्रणा अनिवार्य करावी.