Join us

सर्व्हिस सेंटरआड सुरू होता अवैध पेट्रोल पंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:18 IST

गुन्हे शाखेने केला पर्दाफाश, सहा जणांना अटकसर्व्हिस सेंटरआड सुरू होता अवैध पेट्रोल पंपगुन्हे शाखेने केला पर्दाफाश, सहा ...

गुन्हे शाखेने केला पर्दाफाश, सहा जणांना अटक

सर्व्हिस सेंटरआड सुरू होता अवैध पेट्रोल पंप

गुन्हे शाखेने केला पर्दाफाश, सहा जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्व्हिस सेंटरआ अवैध पेट्रोल पंप सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून समोर आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने तीन जणांना अटक केली आहे. तरणजीत रतनसिंग बंगा (४४), अमरजीत दिलीपसिंग मल्होत्रा (३६), इरफान मेहबूब जुनेजा (३६) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.

वडाळा ट्रक टर्मिनस येथील दशमेश सर्व्हिस सेंटरआड बेकायदा डिझेल पंप स्थापन करून कमी दरात डिझेलची विक्री होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या कक्ष १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी पथकाने छापा टाकला. यात, सर्व्हिस सेंटरच्या आतील बाजूस उभारलेल्या ४५ बाय २५ फुटांच्या जागेत केलेल्या पत्र्याच्या बांधकामात हे अवैध पेट्रोल पंप सुरू होते. यात एकूण पाच मोठ्या सिमेंट ब्लॉकवर १५ हजार लीटर क्षमतेची लोखंडी टँकरची टाकी बसवलेली दिसून आली. तसेेेच बाजूला दहा हजार लीटरची सिंथेटिकची टाकी ठेवलेली होती. दोन्ही टाक्यांमधून लोखंडी पाइपलाइन तयार करण्यात आली होती. तसेच अधिकृत पेट्रोल पंपावर ग्राहकांच्या वाहनाच्या टाकीमध्ये डिझेल भरण्यासाठी वापरण्यात येणारी डिझेल ब्राउजर मशीनही बसविण्यात आली होती.

ही मंडळी स्वस्त दरात डिझेलची विक्री करत असल्याने, या ठिकाणी वाहनचालकांची गर्दी असे. त्यांच्या या अवैध पंपातून ११ लाख ७० हजार रुपये किंमतीचे १५ हजार लीटर डिझेल जप्त करण्यात आले आहे. तसेच या पंपाला टाळे ठोकण्यात आले आहे.

याप्रकरणी सहा जणांविरोधात वडाळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अटक त्रिकुटाला ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.

त्यांनी हे डिझेल कुठून व कसे मिळविले? यात आणखीन किती जणांचा सहभाग आहे? याबाबत अधिक तपास सुरू आहे.