Senior Marathi writer Girija Kiir passes away | ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे निधन 
ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे निधन 

मुंबई - मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिका गिरिजा कीर यांचे आज निधन झाले. त्या 86 वर्षांच्या होत्या. साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ आपली छाप पाडणाऱ्या गिरीजा कीर यांची 100 हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कथा-कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य, आत्मचरित्र असे वैविध्यपूर्ण लेखन करून त्यांनी साहित्य क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला.

गिरिजा कीर यांच्यावर आज रात्री अंत्यसंस्कार होणार असून, त्यांची अंत्ययात्रा रात्री 10 चे सुमारास झपूर्झा, साहित्य-सहवास बांद्रा पूर्व येथून निघेल. 
 

Web Title: Senior Marathi writer Girija Kiir passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.