Join us  

केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरांनी निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 1:12 AM

या आंदोलनात निवासी डॉक्टरांसह तज्ज्ञ डॉक्टरांनीही सहभाग घेतला. शांततेच्या मार्गाने हा निषेध नोंदवला जात असून सर्व डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती बांधून काम केले

मुंबई : निवासी डॉक्टरांना वारंवार होणाऱ्या मारहाणीविरोधात आता केईएम रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनीही आवाज उठविला आहे. कामाच्या ठिकाणी सतत असणारे असुरक्षित वातावरण दूर सारायला हवे, अशी मागणी करत केईएमच्या वरिष्ठ डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले आहे. त्याचप्रमाणे काळ्या फिती बांधून डॉक्टरांवर होणाºया हल्ल्यांचा विरोधही केला.

मंगळवारी सकाळी केईएम अधिष्ठात्यांच्या कार्यालयाबाहेर प्राध्यापक आणि डॉक्टरांनी गर्दी केली होती. या वेळी हाताला काळी फीत लावून शांततेत प्रातिनिधिक आंदोलन करण्यात आले. डॉक्टरांवर होणाºया हल्ल्यांबाबत कारवाई करा, डॉक्टरांना संरक्षण द्या, डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण हवे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या आंदोलनात निवासी डॉक्टरांसह तज्ज्ञ डॉक्टरांनीही सहभाग घेतला. शांततेच्या मार्गाने हा निषेध नोंदवला जात असून सर्व डॉक्टरांनी हाताला काळ्या फिती बांधून काम केले, अशी माहिती केईएम मार्डचे अध्यक्ष डॉ. मनिषकुमार यांनी दिली. यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला लेखी निवेदन सादर करून निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची दखल घेण्याची विनंतीदेखील करण्यात आली आहे. केईएम रुग्णालयातील न्यायवैद्यक विभागाचे साहाय्यक प्राध्यापक डॉ. रवींद्र देवकर यांनी सांगितले की, रुग्ण आणि डॉक्टरांचे नाते वाढणे गरजेचे आहे. डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात अनेकदा आंदोलने करण्यात आली. आता सर्व विभागांतील डॉक्टर एकत्रित येऊन डॉक्टरांना सुरक्षा प्रदान करा, अशी मागणी करत आहोत.

टॅग्स :डॉक्टर