मुंबई : दिवगंत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून रक्तदाबासंबंधी काही समस्या जाणवत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
खार येथील हिंदुजा रुग्णालयात सायरा बानू यांना दाखल करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून त्यांना रक्तदाबासंबंधी समस्या जाणवू लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी सायरा बानू यांचे पती दिलीप कुमार यांचे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. सायरा बानू या दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची काळजी घेत होत्या. दिलीप कुमार रुग्णालयात असताना सायरा बानू त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देत असत. त्यांच्या लग्नाला ५४ वर्षे झाली होती. आता सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.