Join us  

७ फेब्रुवारीला होणार सिनेट निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 5:23 AM

राज्यात लागू झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठातील निवडणुकांचे बिगुल वाजले. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये सिनेट निवडणुकांची लगबग सुरू झाली. मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुका ७ फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर ६ जानेवारीला संकेतस्थळावर मतदार यादी जाहीर होणार आहे.

मुंबई - राज्यात लागू झालेल्या नवीन विद्यापीठ कायद्यानंतर पुन्हा एकदा विद्यापीठातील निवडणुकांचे बिगुल वाजले. राज्यातील सर्वच विद्यापीठांमध्ये सिनेट निवडणुकांची लगबग सुरू झाली. मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुका ७ फेब्रुवारीला होणार असल्याचे जाहीर झाले आहे. तर ६ जानेवारीला संकेतस्थळावर मतदार यादी जाहीर होणार आहे.मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकांमध्ये चार मतदारसंघांच्या निवडणुका ७ फेब्रुवारीला होतील. तर विद्यार्थी प्रतिनिधी, पदवी प्रतिनिधींच्या निवडणुका दुसºया टप्प्यात होतील. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६नुसार, १० प्राचार्य, ६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ३ विद्यापीठ अध्यापक, विविध अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ महाविद्यालयीन विभागप्रमुखांच्या जागांसाठी या निवडणुका होतील. शनिवारी मतदार यादी संकेतस्थळावर जाहीर होईल. निवडणूक कार्यक्रम, अधिसूचना १२ जानेवारीला विद्यापीठ संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :मुंबई विद्यापीठनिवडणूक