Join us

कणकेश्वर शंकराचे स्वयंभू देवस्थान

By admin | Updated: February 16, 2015 23:02 IST

अलिबाग तालुक्यातील शंकराची खूप देवस्थाने आहेत. त्यापैकी मापगाव येथील डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी हे पवित्र शंकराचे देवस्थान आहे.

कार्लेखिंड : अलिबाग तालुक्यातील शंकराची खूप देवस्थाने आहेत. त्यापैकी मापगाव येथील डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी हे पवित्र शंकराचे देवस्थान आहे. शंकराचे स्वयंभू लिंग असलेल्या कणकेश्वर देवस्थानचा इतिहास पुरातन आहे. कनकेश्वर शिवमंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तेथे अनेक ऋषी-मुनी होवून गेले. अलिबाग शहरापासून पंधरा ते वीस किमी अंतरावर हे स्थळ आहे. भाविकांना जाण्या-येण्यासाठी वाहने आहेत. महाशिवरात्र उत्सवाच्या पहाटे देवाची विधिवत पूजा होते. तेव्हापासून भाविक भोलेनाथाच्या दर्शनासाठी उपस्थित असतात. ते दिवसभर दर्शनासाठी लाखो भाविकांची आवक असते. रात्री मंदिरातील गाभारा रंगीबेरंगी फुलांनी सजविलेला असतो. तेव्हाचे रुप तर मनाला समाधान देणारे असते. या दिवस अनेक भाविक आपापल्या नवसानुसार उपवासाच्या पदार्थांचे येणाऱ्या भाविकांना दान करत असतात. या देवस्थानाबद्दल आख्यायिका सांगितली जाते. श्रध्देला जागणारे महादेवाचे मंदिर म्हणूनही या मंदिराकडे भाविकांचा ओघ असतो. येथे आल्यावर समस्यांचे निरसन होत असल्याचीही श्रध्दा आहे. (वार्ताहर)तप करू लागले. त्यावेळी आकाशवाणी झाली की, तुझ्याजवळ असलेला परशु समुद्रात फेकून दे. तो समुद्रात जेथे पडेल तिर्थपर्यंत नवीन भूमी तयार होईल. आणि जेथे परशु पडला असेल त्या ठिकाणी सुवर्णमय लिंगाचे तुला दर्शन होईल. याप्रमाणे परशुरामाने परशु फेकला. त्याप्रमाणे भूमी तयार झाली आणि याच भूमीवर परशुरामाने प्रदीर्घकाळ तपश्यर्चा केली. तसेच या भूमीवर कनकासूर नावाच्या राक्षसाने शिवदर्शन होण्यासाठी मोठी तपश्यर्या केली. त्यामुळे शंकराने पुन्हा प्रसन्न होवून तुझा उद्धार होईल असा दुसरा वर दिला. त्याप्रमाणे कनकासूर आणि देवाचे वास्तव्य या युद्धाच्या ठिकाणी रहावे, असा वर कनकासूराने मागितला. त्यानुसार देवाने राक्षसास पालथे झोपवून त्याच्या पाठीवर यज्ञ केला. या यज्ञत कनकासूर भस्मसात झाला. त्यास मुक्ती मिळाली. तेव्हापासून या भूमिला कनकेश्वर असे नाव पडले, अशी अख्यायिका आहे.कनकेश्वर माथ्यावर हे लिंग असून त्याच्या मध्यभागी नेहमी गंगा वाहते. या डोंगरावर तेजस्वी सुवर्ण असा जांभा दगड आहे. आणि या जांभा दगडाचे शिवलिंग आहे. लिंगाचा भाग झाकून जाईल एवढ्या आकाराचा पृष्ठभागावर काढता घालता येईल असे गोलाकार बांधणीचा आहे. सुंदर कलाकृती सुद्धा पाषाणावर कोरलेली पहायला मिळतील. मंदिराच्या मागच्या बाजूला संपूर्ण जांभा दगडाने बांधलेली मोठी आणि सुंदर अशी पोखरण आहे. त्यामध्ये बाराही महिने पाणी असते.या तीर्थस्थळी जे भाविक जातात त्यांना जवळ जवळ पाच हजार फुट उंचीवर चढल्यानंतर सुद्धा थकवा जाणवत नाही. कारण तेथील वातावरण थंड आणि शांत आहे की दर्शनासाठी गेलेला माणूस पुन्हा भेट देण्यास उत्सुक आहे. कनकेश्वर डोंगरावर जेवण चहा नाश्तासाठी हॉटेल्स उपलब्ध आहे. या तीर्थस्थळी उत्सवासाठी महत्त्व आहेच परंतु एरव्ही सुद्धा पर्यटक दर्शनासाठी येत असतात. (वार्ताहर)४मेढा : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अवचितगड किल्ल्याच्या पायथ्याशी मेढे हे गाव आहे. या गावात ऐतिहासिक स्वयंभू वाकेश्वर देवस्थान आहे. रोहा तालुक्यातील अनेक भाविक श्री महाशिवरात्री उत्सवदिनी,श्रावणी सोमवारी वाकेश्वर मंदिरात येवून न चुकता दर्शनाचा लाभ घेतात.४साधारण अठराव्या शतकाच्या मध्यावर चोरांनी चोरी करण्याच्या दृष्टीने मेढा गावावर चाल केली असता एकाएकी असंख्य भुंगे निर्माण होवून चोरांना चावून चावून सळो की पळो करून सोडले. याशिवाय सर्पदंश झाल्यास या मंदिरात त्या व्यक्तीस रात्रभर जागे ठेवून श्री वाकेश्वराचे नामस्मरण होते.४महाशिवरात्रीचा उत्सव म्हटले की, मेढा गावचा उत्साह ओसंडून जातो. माघ कृष्ण एकादशी ते अमावस्या असा चार दिवस हा उत्सव थाटामाटात साजरा होतो. १कनकेश्वर माथ्यावर हे लिंग असून त्याच्या मध्यभागी नेहमी गंगा वाहते. या डोंगरावर तेजस्वी सुवर्ण असा जांभा दगड आहे आणि या जांभा दगडाचे शिवलिंग आहे. लिंगाचा भाग झाकून जाईल एवढ्या आकाराचा गोलाकार बांधणीचा आहे.२या तीर्थस्थळी जे भाविक जातात त्यांना जवळजवळ पाच हजार फूट उंचीवर चढल्यानंतर सुद्धा थकवा जाणवत नाही. कारण तेथील वातावरण थंड आणि शांत आहे की दर्शनासाठी गेलेला माणूस पुन्हा भेट देण्यास उत्सुक असतो.