Join us

पत्नीसोबत झालेल्या भांडणातून वैज्ञानिक अधिकाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीमधील ३७ वर्षीय वैज्ञानिक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नीसोबत झालेल्या भांडणातून बीएआरसीमधील ३७ वर्षीय वैज्ञानिक अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अणुशक्तीनगर येथील आकाशरत्न इमारतीत कुटुंबीयांसह राहणाऱ्या अनुज त्रिपाठी या वैज्ञानिकाने आत्महत्या केली आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलांना खाण्यासाठी देण्याच्या कारणावरून पत्नी सरोज त्रिपाठीसोबत भांडण झाले. याच भांडणाच्या रागातून त्यांनी बेडरूममधील पंख्याला टॉवेलने गळफास घेतला. बराच वेळ होऊनही ते बाहेर न आल्याने पत्नीने दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. तेव्हा अनुज हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तत्काळ बीएआरसीच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले आहे.

या प्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे सांगितले.