Join us  

विद्यार्थी परिषद निवडणुकांचे वेळापत्रक ३१ जुलैपूर्वी जाहीर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 5:57 AM

मुंबई विद्यापीठात निवडणुकीसाठी कार्यशाळा; २५ वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी विद्यापीठांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन

मुंबई : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक २०१६ नुसार महाविद्यालय आणि विद्यापीठ निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे तब्ब्ल २५ वर्षांनंतर यंदा लिंगडोह समितीच्या शिफारशी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविद्यालयीन आणि विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. या विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे वेळापत्रक ३१ जुलै २०१९ पूर्वी सर्व विद्यापीठांनी जाहीर करावे आणि ३० सप्टेंबर २०१९ पूर्वी विद्यार्थी परिषद निवडणुकींची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे सर्व अकृषी विद्यापीठांना करण्यात आले आहे.

या निवडणुकांमुळे विद्यार्थ्यांमधील नेतृत्वगुणांना चालना मिळेल, असा आशावाद राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केला. ते सोमवारी, मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात विद्यार्थी परिषद निवडणूक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राज्यातील सर्व ११ अकृषी विद्यापीठातील प्र-कुलगुरू, कुलसचिव, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना आणि निवडक प्राचार्य असे एकूण १२१ प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यशाळेमुळे या सर्वांना करण्यात आलेल्या मार्गदर्शनाचा त्यांना लाभ होईल, अशी अपेक्षा विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात येत आहे.कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात ‘रेग्युलेटरी फ्रेमवर्क आॅफ इलेक्शन’ या विषयावर प्राचार्य अनिल राव यांनी मार्गदर्शन केले. या सत्रात प्राचार्य राव यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील निवडणुकांसदर्भातील तरतुदींसंबंधी मार्गदर्शन केले. दुसºया सत्रात समान परिनियम समिती सदस्य आनंद मापुसकर यांनी ‘प्रोसेजिअरल अस्पेक्ट आॅफ इलेक्शन’ या विषयांवर मार्गदर्शन केले.यामध्ये निवडणुकांसाठीची पात्रता, मतदार यादी, निवडणूक पद्धतीविषयी त्यांनी माहिती दिली. तिसºया सत्रात शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी ‘टाइमलाइन फॉर इलेक्शन प्रोग्राम’ या विषयावर मार्गदर्शन केले.नेतृत्वगुणांना चालनाच्सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही महाराष्ट्रात महाविद्यालयीन निवडणुका होत नव्हत्या. मात्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन निवडणुकांमधून खºया अर्थाने नेतृत्वाची संधी मिळावी व लोकशाही मार्गाने सार्वत्रिक मतदानाच्या माध्यमातून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यास वाव मिळावा यासाठी राज्य शासनाच्या वतीने विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीचे एकरूप परिनियम तयार करण्यात आल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या वेळी दिली.च्विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकांमुळे नेतृत्वगुण विकासाला चालना मिळणार आहे. उमेदवार विद्यार्थ्यांना आपल्या मतदारांसमोर स्वत:ची भूमिका मांडावी लागेल. विद्यार्थी विकासासाठी कटिबद्ध असणारे विद्यार्थी मंडळ तयार होईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबई