Join us  

नगरसेविकेला धक्काबुक्की, स्वच्छता दौऱ्यादरम्यानचा प्रकार, मायलेकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 3:07 AM

पालिका अधिकारी आणि महिला नगरसेविकेला धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्याचा प्रकार सोमवारी अंधेरीत घडला. या प्रकरणी मायलेकाला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : पालिका अधिकारी आणि महिला नगरसेविकेला धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्याचा प्रकार सोमवारी अंधेरीत घडला. या प्रकरणी मायलेकाला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.अंधेरी पश्चिमच्या उस्मानिया मशिदीजवळ दुपारी साडे बाराच्या दरम्यान ही घटना घडली. प्रभाग क्रमांक ६६च्या नगरसेविका मेहर हैदर या त्यांच्या विभागात स्वच्छता पाहणी करत होत्या. त्या वेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आणि पालिकेच्या के वेस्ट वॉर्डमधील घनकचरा विभागातील अधिकारी होते. या परिसरात एका स्वच्छतागृहाकडे जाताच एक महिला आणि दोन व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी हैदर आणि पालिका अधिकाºयांना रोखत त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना स्वच्छतागृहाची पाहणी करण्यासही मज्जाव करण्यात आला. त्यामुळे अखेर पालिका अधिकाºयांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. तेव्हा डी.एन. नगर पोलिसांनी बिल्कीस खान आणि तिच्या मुलाला ताब्यात घेतले. तर तिचा पती असिफ खान मात्र फरार झाला. संशयित हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत. स्वच्छतागृह परिसरात पोलिसांना नशेसाठी वापरण्यात येणारे काही साहित्य सापडले आहे. त्यानुसार खान कुटुंबीय या परिसरात हे पदार्थ विकत होते का? तसेच त्यांचा पर्दाफाश होईल या भीतीने त्यांनी वाद घातला का, याबाबत चौकशी सुरू आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी सांगितले.

टॅग्स :अटक