Join us  

स्कॅनिंग नीट झाले नाही म्हणून पेपर तपासला नाही, विद्यार्थिनीला ३ पेपरमध्ये केटी; वर्ष गेले वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 5:57 AM

मुंबई विद्यापीठातील निकाल अजूनही गोंधळ सुरूच आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीला तीन विषयांत केटी लागल्याने तिने तीनही पेपर पुनर्मूल्यांकनासाठी टाकले तसेच फोटोकॉपीदेखील मागवल्या.

मुंबई : मुंबई विद्यापीठातील निकाल अजूनही गोंधळ सुरूच आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीला तीन विषयांत केटी लागल्याने तिने तीनही पेपर पुनर्मूल्यांकनासाठी टाकले तसेच फोटोकॉपीदेखील मागवल्या. पण फोटोकॉपी मेलवर आल्या आणि तिला धक्का बसला. एका पेपरचे फक्त पुरवणीचे गुण तिला देण्यात आले होते, तर दुसºया पेपरची मुख्य उत्तरपत्रिकाच स्कॅन केली नव्हती. त्यामुळे या विद्यार्थिनीला केटी लागली. यामुळे वर्ष वाया गेल्याचा आरोप या विद्यार्थिनीने केला आहे.तीन विषयांत केटी लागल्याने सप्टेंबर महिन्यात या विद्यार्थिनीने पुनर्मूल्यांकन आणि फोटोकॉपीसाठी अर्ज केला. पण अन्य विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झाले किंवा त्यांना फोटोकॉपी मिळाली तरी या विद्यार्थिनीची प्रतीक्षा कायम होती. अखेर तिने विद्यापीठात जाऊन पाठपुरावा केला. तिच्या मागणीनुसार कॉन्ट्रॅक्ट २ चा पेपर तिला मेलवर मिळाला. पेपरची पीडीएफ उघडल्यावर विद्यार्थिनीला धक्का बसला. तिने या पेपरची पुरवणी उघडली. या पुरवणीत तिला ४२ गुण मिळाले होते, पण ही पुरवणी तिने मुख्य उत्तरपत्रिकेला जोडली होती. पण, ही मुुख्य उत्तरपत्रिकाच तिला मिळालीच नाही. पाठपुरावा केल्यानंतर दुसºया अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ या पेपरची फोटोकॉपी तिला मिळाली. पण, हा पेपर नीट स्कॅन न झाल्याने फक्त पुरवणी तपासण्यात आली. मुख्य उत्तरपत्रिकेत ७२ गुणांचे प्रश्न सोडविले होते, पण स्कॅनिंग नीट न झाल्याने उत्तरपत्रिका तपासली गेली नसल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी विद्यापीठातील संबंधित अधिकाºयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.>तिसºया वर्षात प्रवेश घेता आला नाहीकेटी परीक्षेला दोन दिवस राहिले आहेत. माझी चूक नसताना मला केटी लागली आहे. काही तरी करा, अशी विनवणी विद्यापीठातील संबंधित व्यक्तीला केली. पण आता तुला प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तू प्रार्थना कर, असे सांगण्यात आले. या निकालामुळे मला तिसºया वर्षात प्रवेश घेता आला नाही. विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे आपले वर्ष वाया गेल्याचे विद्यार्थिनीने सांगितले.

टॅग्स :मुंबईविद्यापीठ