Join us

‘साठे महामंडळ पुन्हा सुरू करा’

By admin | Updated: August 10, 2015 01:35 IST

अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यामुळे कारभार ठप्प पडला आहे. मात्र त्यामुळे शैक्षणिक कर्जापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे

मुंबई : अण्णा भाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यामुळे कारभार ठप्प पडला आहे. मात्र त्यामुळे शैक्षणिक कर्जापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. परिणामी, तात्पुरत्या स्वरूपावर शासनाने महामंडळाचा कारभार सुरू करण्याची मागणी अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांनी केली आहे.गोपले यांनी सांगितले की, या कर्जाच्या जोरावर समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पुरवठा थांबवल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे. शिवाय उद्योगधंद्यांसह विविध प्रकरणांत समाजातील गरजूंना होणारा कर्जपुरवठाही शासनाने थांबवला आहे. तो पूर्ववत सुरू करावा. महामंडळाकडून समाजातील गरजूंना २० हजारांपासून १० लाखांपर्यंतचे कर्ज पुरवले जाते. मात्र त्यासाठी मागवण्यात येणारे अर्ज थांबवण्यात आले आहेत.