सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 11:15 AM2020-01-21T11:15:47+5:302020-01-21T11:20:40+5:30

छत्रपती शिवाजी महाराज योगपुरुष असून शिवरायांचा अपमान सहन करणार नाही.

Sanjay Raut says it is wrong to use Chhatrapati Shivaji Maharaj for politics | सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल

सातारा, सांगली बंद पुकारणारे काय भूमिका घेणार?; शिवाजी महाराजांच्या 'त्या' व्हिडिओवरुन संजय राऊतांचा सवाल

Next

मुंबई: आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा दाखवण्यात आल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज योगपुरुष असून शिवरायांचा अपमान सहन करणार नसल्याचे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. 

शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणाऱ्या उदयनराजे भोसले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान दिले होते. संजय राऊत यांच्या या वक्तव्याचा विविध संघटनांकडून निषेध करण्यात आला होता. तसेच सातारा आणि सांगली बंदची हाक देखील देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करणं अत्यंत चुकीचं आहे असं सांगितले. तसेच मी शिवसेनेच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना हा व्हिडिओ पाठवला आहे. त्याचप्रमाणे सातारा, सांगली येथे बंद पुकारणारे आता काय प्रतिक्रिया देतात हे मला पाहायचे असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. 

पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन दिल्ली निवडणुक 2020 असं नाव देऊन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तानाजी चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगणच्या चेहऱ्याच्या जागी अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकरणाऱ्या शरद केळकरच्या चेहऱ्यांच्या जागी नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवण्यात आला आहे. तसेच उदयभान राठोडची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या जागी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा चेहरा लावण्यात आला आहे.त्यामुळे या व्हिडिओवरुन महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता दिसून येत आहे.

दरम्यान, 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, याआधीच राजकीय पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्याअसलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसही दिल्लीमधील आपला दुरावलेला जनाधार पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहे. 

Web Title: Sanjay Raut says it is wrong to use Chhatrapati Shivaji Maharaj for politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.