संजय कुमार नवे मुख्य सचिव; अजोय मेहतांच्या हस्ते स्वीकारला पदभार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 06:16 PM2020-06-30T18:16:39+5:302020-06-30T18:17:12+5:30

संजय कुमार यांनी प्रशासनात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

Sanjay Kumar new Chief Secretary; The post was accepted by Ajoy Mehta | संजय कुमार नवे मुख्य सचिव; अजोय मेहतांच्या हस्ते स्वीकारला पदभार

संजय कुमार नवे मुख्य सचिव; अजोय मेहतांच्या हस्ते स्वीकारला पदभार

Next

मुंबई: राज्याचे मुख्य सचिव म्हणून संजय कुमार यांनी आज सूत्रे हातात घेतली आहे. मावळते मुख्य सचिव म्हणून अजोय मेहत यांचा आज मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. नवे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार यांच्या नियुक्तीचा आदेश गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला होता. त्यानंतर आज संजय कुमार यांनी पदाची सूत्रे हाती घेतली आहे.

संजय कुमार हे अजोय मेहता यांच्याप्रमाणेच १९८४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते गृहनिर्माण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असून त्यांच्याकडे गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारदेखील आहे.अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि प्रवीणसिंह परदेशी हेही मुख्य सचिव पदाच्या शर्यतीत होते मात्र ज्येष्ठतेनुसार संजय कुमार यांना संधी देण्यात आली.

संजय कुमार यांनी प्रशासनात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. बीड, उस्मानाबाद, औरंगाबादचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी जून १९९२ ते सप्टेंबर १९९७ दरम्यान काम पाहिले. त्याआधी ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी होते. पुणे महापालिका आयुक्त, औरंगाबादचे विभागीय आयुक्त, एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक, शालेय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण, महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिवही होते

अजोय मेहता यांची मुख्य सचिवपदाची मुदत आज संपली आहे. त्यांना आणखी तीन महिने मुदतवाढ दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आता त्यांना मुदतवाढ न देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याच वेळी त्यांना मुख्यमंत्री कार्यालयात महत्त्वाची
जबाबदारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहता हे विश्वासू मानले जातात.

मेहतांकडे ही जबाबदारी

कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय, यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असे मुख्यमंत्री सचिवालययाने म्हटले आहे.

Web Title: Sanjay Kumar new Chief Secretary; The post was accepted by Ajoy Mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.