Join us  

‘सलमान खानकडे वैध परवाना नव्हता’

By admin | Published: February 17, 2015 2:23 AM

हिट अ‍ॅण्ड रनची घटना घडली तेव्हा अभिनेता सलमान खानकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता, अशी साक्ष आरटीओ अधिकाऱ्याने सोमवारी सत्र न्यायालयात दिली़

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रनची घटना घडली तेव्हा अभिनेता सलमान खानकडे वाहन चालवण्याचा वैध परवाना नव्हता, अशी साक्ष आरटीओ अधिकाऱ्याने सोमवारी सत्र न्यायालयात दिली़ही घटना २००२ मध्ये घडली़ मात्र त्याचा वाहन चालवण्याच्या परवान्याचे २००४ मध्ये नूतनीकरण झाले, अशी साक्ष अंधेरी आरटीओच्या एका अधिकाऱ्याने दिली़ सलमानच्या वाहन परवान्याचा लेखी तपशीलही त्यांनी न्यायालयात सादर केला़अपघातानंतर सलमानला जे़ जे़ रुग्णालयात रक्त चाचणीसाठी नेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचीही साक्ष या वेळी नोंदवली़ त्यानंतर सलमानने मद्यपान केले होते की नाही, याची चाचणी करताना नियमांचे पालन झाले नाही, असा आरोप बचाव पक्षाने केला़ मात्र असा आरोप बचाव पक्ष करू शकत नसल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला़ वांद्रे येथे भरधाव गाडी चालवत सलमानने चौघांना चिरडले़ यात एकाचा बळी गेला़ याप्रकरणी सलमानविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू आहे़ (प्रतिनिधी)