Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राकडून दोन घरांची विक्री, ६ कोटींना विकले अंधेरीतील दोन पेन्ट हाऊस

By मनोज गडनीस | Updated: November 18, 2023 18:00 IST

अंधेरीमधील ओशिवरा येथे असलेल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये प्रियंकाची दोन पेन्ट हाऊस होती.

मुंबई - गेल्या काही वर्षांत मुंबई, गोवा, न्यूयॉर्क येथे स्थावर मालमत्तांची खरेदी केल्यानंतर चर्चेत आलेल्या अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने अंधेरी येथील दोन पेन्ट हाऊसची नुकतीच विक्री केली आहे. सहा कोटी रुपयांना हा व्यवहार झाल्याची माहिती आहे. 

अंधेरीमधील ओशिवरा येथे असलेल्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये प्रियंकाची दोन पेन्ट हाऊस होती. यापैकी एक घर हे ८६० चौरस फूटांचे असून त्याची विक्री २ कोटी २५ लाख रुपयांना झाली तर, दुसरे घर १४३२ चौरस फूटांचे असून त्याची विक्री ३ कोटी ७५ लाख रुपयांना झाली. बॉलीवूडमध्ये निर्माता, दिग्दर्शक व पटकथाकार असलेल्या अभिषेक चौबे यांनी या दोन्ही घरांची खरेदी केल्याची माहिती आहे. या दोन्ही व्यवहारांकरिता ३६ लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. जून २०२१ मध्ये प्रियंकाने ओशिवरा येथे २०४० चौरस फूटांचे आलीशान घर भाडेतत्वावर घेतले होते. त्याकरिता ती महिन्याला २ लाख ११ हजार रुपये भाडे भरत असल्याची माहिती आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रामुंबई