Join us  

साक्षी मलिकच्या सन्मानावेळी दोन विक्रमांची नोंद

By admin | Published: September 12, 2016 3:58 PM

रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले कांस्य पदक मिळवून देत साक्षी मलिकने इतिहास रचला.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. १२ - रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले कांस्य पदक मिळवून देत साक्षी मलिकने इतिहास रचला. पदक जिंकल्यावर तिच्यावर देशभरातून पुरस्कारांचा वर्षाव सुरूच आहे. नुकताच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे ऑलिम्पिक विजेत्या साक्षी मलिकचा सन्मान करण्यात आला.
 
विलेपार्लेच्या ऑर्कीड हॉटेलमध्ये झालेल्या या सन्मान सोहळ्यात एकाचवेळी दोन विश्वविक्रमांची नोंद झाली. ब्रह्मकुमारीजच्या दीपक हरके यांनी साक्षी मलिकला जगातील सर्वात मोठ फुलांचा पुष्पगुच्छ देऊन  विश्वविक्रम केला. हा फुलांचा पुष्पगुच्छ अहमदनगरच्या शुभ फ्लॉवरचे संचालक सचिन भुतारे यांनी बनवला होता. 
 
१००० गुलाबांच्या फुलांनी हा पुष्पगुच्छ तयार करण्यात आला आहे. याचवेळी साक्षी मलिकने ब्रह्मकुमारीजच्या दीपक हरके यांना जगातील सर्वात छोटी राखी बांधत दुसरा विश्वविक्रम रचला. या राखीची उंची ०.२ से.मी,रुंदी ०.२ से.मी व वजन ०.३०० एमजी आहे. ही राखी ब्रह्मकुमारीजच्या दीपक हरके यांनीच बनवली आहे.
 
या दोन विश्वविक्रमांची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल मध्ये नोंद झाली. ऑलिम्पिक विजेत्या साक्षी मलिकने या सन्मानाबद्दल ब्रह्मकुमारीजच्या दीपक हरके यांचे आभार मानले आहेत. यावेळी ब्रह्मकुमारीच्या क्रिना व तपस्विनी उपस्थित होत्या.