Join us

कामगारांची सुरक्षा वा:यावर

By admin | Updated: November 2, 2014 00:30 IST

ठाणो-बेलापूर औद्योगिक पट्टय़ात सोयीसुविधांचा बोजवरा उडाला आहे. अत्यावश्यक सुविधाअभावी येथील उद्योगांना घरघर लागली आहे.

कमलाकर कांबळे - नवी मुंबई
ठाणो-बेलापूर औद्योगिक पट्टय़ात सोयीसुविधांचा बोजवरा उडाला आहे. अत्यावश्यक सुविधाअभावी येथील उद्योगांना घरघर लागली आहे. कामगार सुरक्षिततेच्या उपाययोजना तोटक्या असल्यामुळे गंभीर अपघातांची शक्यता वाढली आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून या क्षेत्रतील अनेक  बडे उद्योग परराज्यात स्थलांतरीत होत असून कामागारांवर बेकारीची वेळ आली आहे.  
नवी मुंबई महापालिकेच्या कार्यक्षेत्रत मोडणारा टीटीसी औद्योगिक क्षेत्र ही अशिया खंडातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. तब्बल 21 किलोमीटरच्या विस्तीर्ण क्षेत्रत पसरलेल्या या औद्योगिक वसाहतीत सुरक्षिततेच्या अनेक उपायोजनांचा अभाव आहे. एखादय़ा कारखान्यात आगीची दुर्घटना घडल्यास ती तातडीने विझविण्याची यंत्रणा एमआयडीसीकडे नाही. एमआयडीसीचे स्वत:चे अग्निशमन केंद्र आहे. मात्र या वसाहतीच्या अंतर्गत क्षेत्रबाबतच्या उपाययोजनांचा अभाव आहे. अग्निशमन दलाला ठिकठिकाणी पाणी भरण्याची सोय असायला हवी. या क्षेत्रत ती सुविधा असूनही ती कार्यरत नसल्याने आग विझविताना अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागते. तर अनेकदा महापालिका किंवा सिडकोच्या अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागते. महापालिका येथील उद्योजकांकडून कर घेते. मात्र त्याबदल्यात महापालिकेकडून येथील उद्योगांना पायुाभूत सुविधा पुरविण्यात हात आखडता घेतला जातो. त्यामुळे येथील सोयीसुविधांचा बोजवरा उडाला आहे. रस्त्यांची चाळण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वीजेच्या सततच्या लंपडावामुळे उद्योजक हैराण आहेत. ढिसाळ सुरक्षेमुळे भुरटय़ा चोरांचा वावर वाढला आहे. दैनंदिन साफसफाईला हरताळ फासल्याने परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.  यासंदर्भात येथील उद्योजकांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यानंतर महापालिकेने काही भागात रस्ते दुरूस्ती केली. मात्र ती सुध्दा केवळ औपचारिकता ठरल्याचे उद्योजकांचा आरोप आहे.
 
वर्षाला सरासरी आगीचे 190 कॉल
च्मुकूंद कंपनी ते उरण फाटा दरम्यानच्या विस्तीर्ण क्षेत्रत पसरलेल्या टीटीसी औद्योगीक क्षेत्रसाठी केवळ एकच अग्निशमन दल कार्यरत आहे. या केंद्रात वर्षाला सरासरी 190 कॉल्स येतात. यात आगीच्या दुर्घटनांसह शॉर्ट सर्किट, गॅस गळती, तेल गळती आदींचा समावेश आहे. 
च्मागील काही वर्षात या क्षेत्रतील मोठय़ा रासायनिक कंपन्या बंद पडल्याने तसेच कारखानदारांत मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाल्याने आगीच्या दुर्घटनात कपात झाल्याचे एमआयडीसी अग्निशमन केंद्राकडून सांगण्यात आले.
 
ठाणो-बेलापूर औद्योगीक क्षेत्रत सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नियोजन करण्यात आले आहे. मात्र त्या कार्यरत नसल्याने त्या निरोपयोगी ठरल्या आहेत. शिवाय पायाभूत सुविधांचा बोजवरा उडाला आहे.  त्याचा प्रतिकूल परिणाम येथील उद्योगांवर झाला आहे.
- किरण चुरी, माजी अध्यक्ष, लघु उद्योजक संघटना, टीटीसी
 
उद्योगांचे परराज्यात स्थलांतर : ठाणो-बेलापूर औद्योगिक वसाहतीत सध्या लहान मोठे तीन ते साडेतीन हजार कारखाने आहेत. सुरूवातीच्या काळात येथे रासायनिक कारखान्यांची संख्या मोठी होती. मात्र मागील काही वर्षात विविध कारणांमुळे येथील अनेक कारखाने बंद पडले आहेत तर काही अन्य राज्यात स्थलांतरीत झाले .सध्या जवळपास 11क्क् रासायनिक कारखाने शिल्लक राहिले आहेत. 
 
टीटीसी औद्योगिक वसाहतीचे ठळक वैशिष्टय़े
सुमारे 21 किलोमीटर क्षेत्रफळाच्या परिसरात 2560 हेक्टर जागेवर ठाणो-बेलापूर औद्योगीक वसाहतीचा विस्तार झाला आहे. या क्षेत्रसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून दिवसाला 52 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो. 
 
180 किलोमीटर लांबीचे रस्ते  तर सांडपाणी वाहून नेण्यासाठी 34.5 किमी लांबीच्या वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या क्षेत्रसाठी दिवसाला 450 मेगाव्हेट वीज पुरवठा केला जातो.