“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 02:08 PM2021-09-17T14:08:50+5:302021-09-17T14:21:27+5:30

शरद पवारांनी सचिन वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध दर्शवला होता.

sachin vaze told to ed that anil deshmukh demands rs 2 crore to convince sharad pawar | “शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट'

“शरद पवारांना राजी करण्यासाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते”; सचिन वाझेचं ED ला 'स्टेटमेंट'

googlenewsNext
ठळक मुद्देशरद पवारांनी सचिन वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध होताED आरोपपत्रात सचिन वाझे यांच्यासह अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे, कुंदन शिंदे यांचा समावेशया आदेशांवर मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब नाराज होते

मुंबई: मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले असून, यामध्ये सचिन वाझेसह १४ जणांविरोधात आरोप लावण्यात आलेत. या आरोपपत्रात अनिल देशमुख यांचे नाव नसल्याची माहिती मिळाली आहे. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना राजी करण्यासाठी अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केली होती, असं 'स्टेटमेंट' सचिन वाझेनं ईडी अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले जात आहे. (sachin vaze told to ed that anil deshmukh demands rs 2 crore to convince sharad pawar)

“चंद्रकांत पाटील तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असं माझ्या कानावर आलंय”: CM उद्धव ठाकरे

ईडीच्या आरोपपत्रात सचिन वाझे याच्यासह अनिल देशमुखांचे सहाय्यक पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा समावेश आहे. मुंबईतील बार मालकांकडून वसुली प्रकरणात हे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. या प्रकरणी शेकडो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. यातच आता सचिन वाझेने ईडीकडे मोठे खुलासे केल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. 

ED च्या आरोपपत्रात १४ आरोपी, अनिल देशमुखांचे नावच नाही; नेमके कारण काय?

अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते

शरद पवारांनी सचिन वाझेला मुंबई पोलीस दलात पुन्हा रुजू करवून घेण्यास विरोध दर्शवला होता. शरद पवारांच्या मनधरणीसाठी अनिल देशमुखांनी २ कोटी मागितले होते. जुलै २०२० मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या बदली आणि नियुक्तीचे आदेश जारी केले होते. या आदेशांवर मंत्री अनिल देशमुख आणि अनिल परब नाराज होते आणि त्यांनी आदेश माघारी घेतला होता, असे वाझेने सांगितले.

आता यापुढे कोरोनापासून कशी घ्यावी काळजी, सर्जिकल मास्क वापरावा की कापडी मास्क?

काही तडजोडींनंतर आदेश जारी करण्यात आला 

तीन ते चार दिवसांनंतर मला कळले की, पैसे आणि इतर काही तडजोडींनंतर हा आदेश जारी करण्यात आला होता. या पोलीस अधिकाऱ्यांकडून एकूण ४० कोटी रुपये घेण्यात आले होते. त्यापैकी २० कोटी रुपये संजीव पलांडे यांच्यामार्फत अनिल देशमुख यांना तर, २० कोटी आरटीओ अधिकारी बजरंग करमाटे यांच्यामार्फत अनिल परब यांना देण्यात आले होते, असा दावाही सचिन वाझेने केला. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला त्यांच्या कार्यालय, घरी, राज्य अतिथीगृहात बोलावून विविध प्रकरणांच्या संदर्भात थेट निर्देश किंवा सूचना देत असत. सोशल मीडिया बनावट फॉलोअर केस सारख्या काही प्रकरणांमध्ये तर अनिल देशमुख स्वतःच निर्देश द्यायचे, असेही वाझेने म्हटले आहे. 

Tata आणतेय स्वस्त CNG कार; केवळ ५ हजार रुपयांत बुकिंगला सुरुवात, पाहा

दरम्यान, अनिल देशमुख यांनी प्रत्येक बारमालकाकडून ३ लाख रुपये गोळा करण्याचे आदेश देत १७५० बार आणि रेस्टॉरंटची यादी देण्यात आली होती. वाझेने डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान ४.७ कोटी रुपये गोळा केले होते. त्यानंतर जानेवारी महिन्यात अनिल देशमुख यांनी त्यांच्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून माझ्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर फोन केला आणि आजपर्यंत गोळा केलेली रक्कम कुंदन शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्याच्या सूचना दिल्या, असेही सचिन वाझे सांगितले.
 

Web Title: sachin vaze told to ed that anil deshmukh demands rs 2 crore to convince sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.