मुंबई : सोशल मीडियावरून ओळख झालेल्या रशियाच्या तरुणाने पाठविलेल्या महागड्या गिफ्टसाठी कुर्ला येथील घटस्फोटित महिलेला १७ लाख २२ हजार गमवावे लागले. या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
................................
टीव्ही कलाकारावर आईवर बलात्कार केल्याचा आरोप
मुंबई : ओशिवरा परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय सावत्र आईवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ४० वर्षीय टीव्ही कलाकाराविरुद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात त्यांच्यात मालमत्तेवरूनही वाद असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.
............................................
मालाडमधून आठ लाखांचा गुटखा जप्त
मुंबई : मालाड परिसरातून आठ लाख ४० हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २३) करण्यात आली आहे.
............................