Join us  

आरटीओच्या 1 हजार 500 कर्मचाऱ्यांकडून 1 कोटी रुपयांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 4:50 PM

सिनेकलाकार, उद्योगपती, खेळाडू कोरोनाशी सामना करण्यासाठी आर्थिक सहाय्य करत आहे. 

मुंबई : कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी प्रत्येकजण मदतीसाठी पुढाकार घेत आहे.  महाराष्ट्र राज्याच्या मोटार वाहन विभागातील (आरटीओ)तील कार्यकारी अधिकारी संघटनेने 1 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघटनेच्या राज्यभरातील 1 हजार 500 कर्मचाऱ्यांनी मासिक वेतनातील तीन दिवसाचा पगार मदत म्हणून देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांना ही माहिती पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. 

सिनेकलाकार, उद्योगपती, खेळाडू कोरोनाशी सामना करण्यासाठी आर्थिक सहाय्य करत आहे. ऑल इंडिया एसी, एसटी एम्प्लाइज असोसिएशनच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत निधी म्हणून 70 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या असोसिएशनच्या देशातील 3.50 लाख एसी, एसटी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील एक दिवसाचा पगार मदत निधीसाठी देण्यात येणार आहे.   तसेच राज्य सरकार या महामारीतून निघण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या मोटार वाहन विभागातील (आरटीओ) कार्यकारी अधिकारी संघटना मदतीसाठी पुढे आली आहेत. या संघटनेचे सुमारे 1 हजार 500 सभासद अधिकाऱ्यांनी 1 कोटी रुपयांची मदत करणार आहे.