आरपीएफच्या जवानाकडून ओला चालकावर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 01:16 AM2020-01-14T01:16:39+5:302020-01-14T01:16:44+5:30

कर्नाक बंदरजवळील घटना : अत्याचारानंतर केली लूट, जवान अटकेत

RPF jawans torture wet driver | आरपीएफच्या जवानाकडून ओला चालकावर अत्याचार

आरपीएफच्या जवानाकडून ओला चालकावर अत्याचार

Next

मुंबई : रात्री ड्युटी संपवून दारूच्या नशेत घरी जात असताना, आरपीएफच्या जवानाने ओला टॅक्सी चालकाला नग्न करत, त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कर्नाक बंदरजवळ घडली. अमित कुमार रमेश सिंग (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने नशेतच चालकाकडील पैसे काढून आणखीन पैशांची मागणी केली.

सिंग हा गेल्या पाच वर्षांपासून आरपीएफ मध्ये असून, सध्या तो सीएसएमटी स्थानकात कार्यरत होता. चालकाने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, शनिवारी रात्री उशीरा चालक पोलीस आयुक्तालयाबाहेर बुकिंगच्या प्रतीक्षेत होता. बुकिंग मिळताच तो कर्नाक बंदरच्या दिशेने रवाना झाला. तेथे प्रवाशाची वाट पाहत असताना सिंग धडकला. सिंगने त्याला ग्रॅण्ट रोड येथील कुंटणखान्याकडे सोडण्यास सांगितले. आॅनलाइन बुकिंग असल्याने चालकाने त्याला नकार देत, अन्य कार बुक करण्याची विनंती केली. याच रागात दारूच्या नशेत सिंगने त्यांना कारमध्ये ढकलून त्याला मारहाण सुरू केली.

सिंगने नशेतच चालकाला बाहेर काढून त्याच्या खिशातील ८५० रुपये काढून घेतले. त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. त्यानंतर, त्याला मारण्याची धमकी देत, आणखी २ हजार रुपयांची मागणी केली. तेव्हा दोन पादचाऱ्यांचे लक्ष जाताच, त्यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस असल्याचे सांगून दोघांनाही तेथून जाण्यास सांगितले. पादचाऱ्यांनी याबाबत पोलीस नियंत्रण कक्षास माहिती दिली.
एमआरए मार्ग पोलीस तेथे पोहोचले. त्यांनी सिंगसह चालकाला पोलीस ठाण्यात आणले, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार, एमआरए मार्ग पोलिसांनी सिंगविरुद्ध अनैसर्गिक अत्याचार, खंडणी, मारहाण यांसारखे गुन्हे दाखल करत, पोलिसांनी त्याला अटक केली. अमित कुमार रमेश सिंग याच्या अटकेच्या वृत्ताला एमआरए मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कांबळे यांनी दुजोरा दिला. न्यायालयाने त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: RPF jawans torture wet driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.