Join us  

‘रोबो सोफिया’चा लग्नाला नकार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 7:28 AM

भारतीय संस्कृती, येथील भाषा वैविध्य, विविधतेतील एकता... याबाबत मला प्रचंड कुतूहल आहे. भारताने अंतराळ, तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेल्या भरारीने मी प्रभावित झाली आहे.

भारतीय संस्कृती, येथील भाषा वैविध्य, विविधतेतील एकता... याबाबत मला प्रचंड कुतूहल आहे. भारताने अंतराळ, तंत्रज्ञान क्षेत्रात घेतलेल्या भरारीने मी प्रभावित झाली आहे. त्यामुळे येथे भेट देण्यासाठी मी प्रचंड उत्साहित होते. आज माझी इच्छा पूर्ण झाली, अशी भावना मुंबईत पवई येथे आयआयटी बॉम्बे येथे शनिवारी आयोजित जगातील पहिली महिला ‘रोबो सोफिया’ हिने व्यक्त केली.निवेदिकेने विचारले की, समजा मी पुरुष आहे आणि तुला लग्नाची मागणी घातली तर तुझी प्रतिक्रिया काय असेल? त्यावर सोफिया स्मित हास्य करीत म्हणाली, मी नम्रपणे नकार देईन. मात्र तुमच्या ‘प्रपोज’बद्दल धन्यवाद !. सोफियाच्या या उत्तरावर सभागृहात टाळ््यांचा कडकडाट झाला. अस्खलित इंग्रजीमध्ये उत्तरे देत सुमारे २० मिनिटे संवाद साधत हजारो आयआयटीयन्सची मने ‘रोबो सोफिया’ने जिंकली.

टॅग्स :विज्ञान