Join us  

‘साइड स्ट्रीप्स’मुळे रस्त्याची रया गेली

By admin | Published: July 26, 2016 5:02 AM

मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या वादात, खड्ड्यात गेलेल्या मुंबईमुळे चाकरमान्यांचे हाल सुरूच आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने

- सचिन लुंगसे ल्ल मुंबई

मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या वादात, खड्ड्यात गेलेल्या मुंबईमुळे चाकरमान्यांचे हाल सुरूच आहेत. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटण्याच्या मार्गावर असले, तरीही अद्याप शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. याचाच प्रत्यय पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ पूर्वेकडील हंस भुग्रा मार्गावर चालताना येत असून, मार्गासह साइड स्ट्रीप्सच्या झालेल्या दुरवस्थेमुळे या रस्त्याची रया गेली आहे.सांताक्रुझ पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती मार्गावरून हंस भुग्रा मार्गाची सुरुवात होते. येथून सुरू झालेला हा मार्ग सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडला जुळतो. पश्चिम द्रुतगती मार्गापासून सांताक्रुझ चेंबूर लिंक रोडपर्यंतच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मिळून सुमारे पन्नासवर खड्डे पडले आहेत, शिवाय चेंबरलगतचा खचलेला भाग वेगळा आहे. या खड्ड्यांत महापालिकेने पेव्हरब्लॉक टाकून ते खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे, तर काही खड्ड्यांमध्ये पेव्हरब्लॉकऐवजी खडी टाकून वरवर काम करण्यात आले आहे. परिणामी, खड्ड्यांतील पेव्हरब्लॉक उखडले आहेत. खड्ड्यांतील खडी रस्त्यावर पसरली आहे.हंस भुग्रा मार्गाच्या दोन्ही बाजूच्या साइड स्ट्रीप्सची अत्यंत दुरवस्था झाली आहे. सांताक्रुझ येथून सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडकडे येताना नजरेस पडणारे साइड स्ट्रीप्स ठिकठिकाणी तुटलेल्या अवस्थेत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, साइड स्ट्रीप्सवरील सर्वच भाग खड्ड्यांत गेला आहे. या साइड स्ट्रीप्सवरील खड्ड्यात गेलेला भाग पेव्हरब्लॉकने बुजवण्यात आला आहे. मात्र, पेव्हरब्लॉक टाकण्यात आलेला भागही खचला आहे. परिणामी, महापालिकेने म्हणजे कंत्राटदाराने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे? हे येथील रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर लक्षात येते.स्लॅब कधी टाकणारहंस भुग्रा मार्गावरील दोन्ही बाजूकडील गटारे उघडी आहेत. गटारांची लांबी अडीच फूट तर खोली पाच फुटांहून अधिक आहे. रस्त्याचे काम करताना गटारांवर स्लॅब अथवा झाकणे बसवणे गरजेचे होते. मात्र, महापालिकेसह कंत्राटदाराकडे याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यातच या रस्त्याची साइड स्ट्रीप्स दुरवस्थेत असल्याने एखाद्या वाहनाचा अपघात झाला, तर ते वाहन थेट गटारातच पडण्याची शक्यता अधिक आहे.ठरावीक ठिकाणीच कामेकलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या कॅम्पासला दोन प्रवेशद्वार आहेत. यातील मागील प्रवेशद्वार हंस भुग्रा मार्गावर आहे. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या फुटपाथचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यावरील उर्वरित भागात कोठेच सौंदर्यीकरण करण्यात आले नाही. परिणामी, रस्त्यालगतचे फुटपाथ आणि पर्यायाने रस्त्याची साइड स्ट्रीप्स खचली आहे.विद्यार्थ्यांना मनस्तापसांताक्रुझ पूर्वेकडील मुंबई विद्यापीठात येणारे बहुतांश विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात. अर्धे-अधिक विद्यार्थी दुचाकीवरून हंस भुग्रा मार्गे विद्यापीठात दाखल होतात. मात्र, या मार्गाची दुरवस्था झाल्याने दुचाकीचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहेनिकृष्ट दर्जाच्या कामाचा पुरावासांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरून पश्चिम द्रुतगती महामार्गाकडे जाताना नजरेस पडणाऱ्या हंस भुग्रा मार्गालगतच्या साइड स्ट्रीप्सची दुरवस्था निकृष्ट दर्जाच्या कामाचा पुरावा देते. या मार्गावरील मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारालगतच्या दोन्ही बाजूच्या साइड स्ट्रीप्स वगळता, संपूर्ण साइड स्ट्रीप्स खचलेली आहे. महत्त्वाचे म्हणजे, मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारालगतच्या फुटपाथवर करण्यात आलेले सौंदर्यीकरण वगळता, या रस्त्यावर कुठेही सौंदर्यीकरण करण्यात आलेले नाही.एकंदर साइड स्ट्रीप्सची झालेली दुरवस्था, दुभाजकांऐवजी रस्त्यांमध्ये मांडण्यात आलेले दगड, खड्डे पडलेल्या भागात टाकण्यात आलेले पेव्हरब्लॉक आणि पेव्हरब्लॉक टाकण्यात आलेला भागही खचल्याने रस्त्याची झालेली दुरवस्था वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, रस्त्याच्या मधोमध पडलेले खड्डेही वाहनचालकांना तापदायक ठरत असून, या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आपल्या वाहनांचा वेग कमी करावा लागत आहे, अथवा खड्ड्यांना वळसा घालत वाहन चालवावे लागत आहे. महापालिका प्रशासनासह कंत्राटदाराने केलेल्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून, येथील काम लवकर झाले नाही, तर पावसाचे उर्वरित दोन महिनेही वाहनचालकांना खड्ड्यातूनच वाट काढावी लागणार आहे.डेब्रिजने रस्ता व्यापलाहंस भुग्रा मार्गालगत ठिकठिकाणी बांधकाम सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे, या बांधकामांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या कामांचा समावेश आहे आणि येथील बांधकामांसह पाडकामामधून निघणारे डेब्रिज या रस्त्यालगत टाकले जात आहे. एके ठिकाणी टाकण्यात आलेल्या स्लॅबची लांबी रुंदी किमान सहा फूट आहे. त्या स्लॅबची संख्या तीन आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे तिन्ही स्लॅब रस्त्यालगतच्या पेव्हर ब्लॉकवर टाकण्यात आले आहेत. परिणामी, पादचारी वर्गाला येथून चालण्यास जागा शिल्लक राहिलेली नाही.खड्ड्यातील पाण्यात डासरस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातील पाणी वाहनांमुळे नाहीसे होत असले, तरी साइड स्ट्रीप्सवर पडलेल्या खड्ड्यांत साचलेले पाणी तसेच आहे. या पाण्यात लगतच्या वृक्षांचा पालापाचोळा पडला असून, पाण्यावर वाहनांचे इंधन पसरले आहे. परिणामी, पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. साइड स्ट्रीप्समधील खड्ड्यातील पाण्यात आता डासांची पैदास झाली आहे.नक्की कामकधी झाले, तेच आठवत नाही...हंस भुग्रा मार्गावर आणि लगत बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये अधिक आहे. त्यांच्या तुलनेत येथील वस्तीची संख्या मात्र कमी आहे. महत्त्वाचे म्हणजे, रस्त्यालगतच्या वस्तीमध्ये वास्तव्य करणाऱ्या स्थानिकांना या मार्गाचे काम नक्की कधी झाले? हे आठवत नाही, अशी अवस्था आहे.