Join us  

मुंबईतील वाढत्या रस्ते अपघातांना लगाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 6:05 AM

मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये घट झाल्याची माहिती मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल २०१७द्वारे समोर आली आहे.

मुंबई : मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये घट झाल्याची माहिती मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल २०१७द्वारे समोर आली आहे. २०१५च्या तुलनेत २०१७च्या अपघातामध्ये घट झाली आहे. त्यामुळे मुंबईकर रस्ता सुरक्षेबाबत जागरूक होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अपघातांमध्ये मरण पावलेल्यांमध्ये सर्वाधिक बळी तरुणांचे गेल्याचेही उघडकीस आले आहे.मुंबई वाहतूक पोलीस, आयआयटी मुबंई आणि ब्लूमबर्ग फिलॅन्थ्रॉपिक इनिशिएटिव्ह फॉर ग्लोबल रोड सेफ्टी यांच्या वतीने मुंबई रस्ता सुरक्षा अहवाल बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. वाहतूक पोलीस, आयआयटी मुंबई आणि ब्लूमबर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणानुसार २०१७मध्ये ४६७ रस्ते अपघात झाले. यात ४९० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सर्वाधिक अपघाती मृत्यू हे २० ते २४ वयोगटातील आहेत. या वयोगटात ८३ टक्के तरुणांचा आणि १७ टक्के तरुणींचा समावेश आहे.सर्व्हेनुसार, २०१५च्या तुलनेत २०१७च्या अपघातांमध्ये घट झाली आहे. २०१५मध्ये ५८६ अपघातांमध्ये ६११ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर २०१७ मध्ये ४६७ अपघातांमध्ये ४९० नागरिकांचा मृत्यू झाला. म्हणजे २०१५च्या तुलनेत २०१७च्या अपघातांमध्ये २० टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईकरांमध्ये रस्ता सुरक्षा नियमांबाबत जागरूकता निर्माणहोत असल्याचे यातून दिसून येतआहे.>रस्ते अपघातवर्ष अपघात मृत्यू२०११ ५३९ ५६३२०१२ ४७१ ४८८२०१३ ५७४ ५९५२०१४ ५७४ ५९८२०१५ ५८६ ६११२०१६ ५२९ ५६२२०१७ ४६७ ४९०रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण खालीलप्रमाणे :पादचाऱ्यांचा मृत्यू - ५२ टक्केदुचाकीचालक मृत्यू - २४ टक्केदुचाकीच्या मागील प्रवाशाचा मृत्यू - १४ टक्केतीन आणि चारचाकीचालकांचा मृत्यू - ०४ टक्केतीन आणि चारचाकी वाहनांतील प्रवासी - ०३ टक्केसायकलचालक - ०२ टक्केवाहनचालकांच्या चुकीमुळे ‘पादचाºयांना’ शिक्षा!मुंबईतील रस्ते अपघातांमध्ये पादचाºयांचे मृत्यूचे प्रमाण ५२ टक्के असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट करण्यात आले आहे.