Rhea Chakraborty mobile number call another person faces a volly of abuse sushant Navi Mumbai | रिया चक्रवर्तीचा मोबाइल नंबर समजून 'या' व्यक्तीला लोक देत आहेत शिव्या, वैतागून मोबाइल केला बंद...

रिया चक्रवर्तीचा मोबाइल नंबर समजून 'या' व्यक्तीला लोक देत आहेत शिव्या, वैतागून मोबाइल केला बंद...

एक व्यक्ती अज्ञात लोकांकडून येणाऱ्या कॉल्सने इतकी हैराण झाली की, त्याला त्याचा मोबाइल बंद करावा लागला. त्याला इतके कॉल्स आलेत कारण सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये रिया चक्रवर्तीचं नाव आलं. याचं कारण म्हणजे रियाचा मोबाइल नंबर आणि त्याचा मोबाइल नंबर मिळता-जुळता आहे.
 मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, नवी मुंबईत राहणाऱ्या ३२ वर्षीय सागर सुर्वेला अज्ञातांकडून अनेक विचित्र कॉल्स आलेत. हे तेव्हापासून झालं जेव्हापासून सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये नाव येणारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स मीडियात सार्वजनिक झालेत.

काही दिवसांपूर्वीच रिया चक्रवर्तीचे कॉल डिटेल्स मीडियात दाखवण्यात आले होते. ज्यात रिया चक्रवर्तीने कुणाला किती फोन केले याची माहिती होती. या रियाचा मोबाइल नंबरही दाखवण्यात आला होता. आता रियाचा मोबाइल नंबर समजून लोक नवी मुंबईत राहणाऱ्या सागरला त्रास देत आहेत. त्याच्या मोबाइलचा केवळ एक डिजीट रियाच्या नंबरपेक्षा वेगळा आहे. बाकी रियाचा आणि त्याचा नंबर सारखाच आहे.

या गैरसमजामुळे लोक सागरला फोन करून शिव्या देत आहेत. हा सगळा प्रकार सुरू झाल्यावर त्याने फोन उचलणे बंद केले. त्यानंतर त्याला घाणेरडे मेसेज आणि व्हिडीओ येऊ लागले. आता या प्रकाराला कंटाळून सागरने १५० नंबर ब्लॉक केले. पण तरी काही फोन कॉल्स येणं थांबलं नाही. अखेर तो जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याला सांगण्यात आले की, काही दिवस त्याने मोबाइल बंद ठेवावा आणि नंतर दुसरं सिम कार्ड घ्यावं.

यानंतर सागर त्याच्या मित्राचा मोबाइल नंबर वापरू लागला आहे ज्यामुळे तो त्याचा परिवार, मित्रांसोबत आणि ऑफिससोबत कनेक्ट होऊ शकत नाहीये. आता तो या प्रतिक्षेत आहे की, कधी एकदाचं सुशांत सिंह राजपूत प्रकरण मार्गी लागेल आणि कधी त्याला यातून सुटका मिळेल.

हे पण वाचा :

Shocking ! आमिर खानच्या संपर्कात होती रिया चक्रवती, इतक्या वेळा केले फोन आणि मेसेज

Sushant Singh Rajput Case : यूरोप ट्रिपवर 'ही' पेंटिंग पाहून बदलली होती सुशांतची वागणूक, रियाने केला आश्चर्यकारक दावा!

Sushant Singh Rajput Case : AU नावाच्या व्यक्तीसोबत फोनवर ६३ वेळा बोलली रिया? पण कोण आहे ही AU?

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rhea Chakraborty mobile number call another person faces a volly of abuse sushant Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.