फोटो फॉरवर्ड केला म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 07:36 PM2020-09-11T19:36:16+5:302020-09-11T19:39:10+5:30

भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या महिला अध्यक्षा प्रीती गांधी यांनीही आपल्या ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, या खराब वातावरणामुळे मन व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटंलय. 

Retired Navy officer beaten by Shiv Sainiks for forwarding photo, FIR lodged in kandivali | फोटो फॉरवर्ड केला म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

फोटो फॉरवर्ड केला म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

Next
ठळक मुद्देभाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या महिला अध्यक्षा प्रीती गांधी यांनीही आपल्या ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, या खराब वातावरणामुळे मन व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटंलय. 

मुंबई - कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला असतानाच शिवसैनिकांनी एका निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कांदिवली येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांनीच स्वत; तक्रार दिली आहे. त्यानंतर, भादंवि अनुसार 325, 143, 147, 149 अन्वये मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

''एका महिलेवर ताकद आजमावल्यानंतर उद्धव यांचे कार्टून व्हाट्सएप वर फॉरवर्ड केले म्हणून शिवसैनिकांनी घरात घुसून मदन शर्मा या माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली, त्यांचा डोळा फोडला. याप्रकरणी FIR दाखल करण्यात आला असला तरी सत्तापिसाटांचा हा माज उतरवण्याची वेळ आली आहे असेच म्हणावे लागेल. देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आयुष्यातील काही वर्षे खर्ची घातली असे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना भुरट्या शिवसैनिकांनी केलेली मारहाण पक्षाची मानसिकता दाखवणारी आहे. जे घराबाहेर पडण्याची हिंमत दाखवून शकले नाहीत त्यांचे चेले वृद्धाना ताकद दाखवतायत.'', असे भातखळकर यांनी म्हटलं आहे. फिर्यादी मदन शर्मा यांच्या तक्रारीवरुन आरोपी कमलेश कदम व त्याच्या 8 ते 10 साथीदारांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरुन एफआयआरची कॉपी आणि मारहाणीचा व्हिडिओही शेअर केला आहे. 

भाजपाच्या सोशल मीडिया सेलच्या महिला अध्यक्षा प्रीती गांधी यांनीही आपल्या ट्विटरवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओ शेअर करताना शिवसेनेवर निशाणा साधला आहे. तसेच, या खराब वातावरणामुळे मन व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटंलय. 

कंगना vs शिवसेना वाद

 मुंबईत सुरू असलेल्या कंगना राणौत आणि शिवसेनेमधील वादाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. कंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर आता कंगनाविरोधात ड्र्ग्स केसची चौकशीही होणार आहे. याच दरम्यान या प्रकरणी आता विश्व हिंदू परिषदेनं कंगनाची बाजू घेतली आहे. अयोध्येतील संतांनी कंगनाचं समर्थन केलं असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये. यापुढे अयोध्येत उद्धव ठाकरेंचं स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार" असल्याचं म्हटलं आहे.

Web Title: Retired Navy officer beaten by Shiv Sainiks for forwarding photo, FIR lodged in kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.