Join us  

निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार बोधचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:25 AM

कर्मचा-यांना वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते महापालिकेचे बोधचिन्ह असलेले सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबई : सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यांना वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते महापालिकेचे बोधचिन्ह असलेले सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांच्या सेवेचा गौरव करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या अनुषंगाने सादर प्रशासकीय प्रस्तावाला महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प संचालक विनोद चिठोरे यांनी दिली.महापालिकेचे कर्मचारी हे सामान्यपणे आपल्या वयाची ५८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर निवृत्त होतात, तर महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षक कर्मचारी हे वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर निवृत्त होतात. निवृत्त होणाºया कर्मचाºयांना निरोप समारंभ आयोजित करण्याची प्रथा आहे. मात्र, यासाठी आजवर अधिकृत अशी कार्यपद्धती व आर्थिक तरतूद नव्हती. हे लक्षात घेऊन महापालिकेतून निवृत्त होणाºया कर्मचाºयांचा महापालिकेचे बोधचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्याचा प्रस्ताव अभियांत्रिकी सेवा प्रकल्प कार्यालयाद्वारे सादर करण्यात आला होता.